मुंबई - मालाड मालवणी येथील घर दुसऱ्या घरावर कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच दहिसर शिवाजी नगर येथे तीन घरे कोसळण्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका २६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. प्रद्युम्न सरोज असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी पाऊस सुरू असताना दहिसर लोखंडी चाळ, शिवाजी नगर, शंकर मंदिराजवळील तीन घरे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. त्यांनी शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान सात ते आठ जणांना बाहेर काढले. तरुणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रद्युम्न सरोज असे मृताचे नाव असून तो २६ वर्षाचा आहे.
हेही वाचा-एन ९५ मास्कहून अधिक प्रभावी असलेल्या नॅनॉटेक मास्कची निर्मिती- सिंगापूर विद्यापीठ
मालाड दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू -
मालाड, मालवणी येथे काल रात्री ११ च्या सुमारास एक दुमजली घर शेजारील घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जण जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात दाखल केले असता, त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला. आज सायंकाळी शोध कार्य सुरू असताना ढिगाऱ्याखालून आणखी एका व्यक्तीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे मालाड दुर्गटनेत मृतांचा आकडा १२ वर पोहचला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटूंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-अनिल देशमुखांवरील गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल याचिकेला आमचा आक्षेप - सीबीआय