ETV Bharat / city

दीड फूट लांबीची सळई छातीतून आरपार; महिलेवर सायन रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया - सळई आरपार महिला कामगार मुंबई

विक्रोळी येथे बांधकाम साईटवर काम सुरू असताना वरच्या मजल्यावरून सळई पडून खालील मजल्यावर काम करत असलेल्या महिलेच्या छातीत घुसली. छातीत दीड फूट सळई घुसलेल्या या महिलेला मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या महिलेवर तब्बल तीन तास शस्त्रक्रिया चालली.

rod pierced chest women mumbai
सळई आरपार महिला कामगार सायन रुग्णालय
author img

By

Published : Jun 26, 2021, 5:18 PM IST

मुंबई - विक्रोळी येथे बांधकाम साईटवर काम सुरू असताना वरच्या मजल्यावरून सळई पडून खालील मजल्यावर काम करत असलेल्या महिलेच्या छातीत घुसली. छातीत दीड फूट सळई घुसलेल्या या महिलेला मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या महिलेवर तब्बल तीन तास शस्त्रक्रिया चालली. अथक प्रयत्न करून महिलेच्या छातीतील सळई कौशल्यपूर्वक काढली असून, महिलेची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

हेही वाचा - मुंबईतील परिचारिकांच्या लढ्याला यश; 100 टक्के मागण्या मान्य

नेमके काय घडले -

१९ जून रोजी विक्रोळी पूर्व परिसरात निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी एक पती-पत्नी कामगार म्हणून कार्यरत आहेत. यातील कामगार असणारी महिला खालच्या मजल्यावर काम करीत होती. हे काम करत असताना साधारणपणे दुपारी ३ वाजताच्या सुमारास वरच्या मजल्यावरून एक सळई पडली. ही सळई दुर्दैवाने महिलेच्या छातीत आरपार घुसली. त्यानंतर या अत्यंत गंभीर अवस्थेतील महिलेला तात्काळ महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारानंतर महिलेची गंभीर परिस्थिती बघून तिला शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास हलविण्यात आले.

सलग ३ तास शस्त्रक्रिया -

महिलेची अत्यंत गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या महिलेच्या छातीत सळई आरपार घुसलेली असल्यामुळे या महिलेला शस्त्रक्रिया गृहातील (Operation Theatre) 'बेड'वर झोपवणेही शक्य होत नव्हते. बऱ्याच प्रयत्नानंतर या महिलेस एका कुशीवर झोपवून ही शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली. साधारणपणे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सुरू झालेली ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया रात्री १० वाजेपर्यंत म्हणजेच सलग ३ तास सुरू होती. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयातील तीन विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांचा समावेश असलेली १२ व्यक्तींची टीम कार्यरत होती. सदर दुर्दैवी घटना घडली, त्याच दिवशी रात्री १० वाजताच्या सुमारास अत्यंत अवघड शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि महिलेच्या छातीतून सळई यशस्वीपणे काढण्यात येऊन महिलेचे प्राण वाचविण्यात आले. आता घटनेच्या एका आठवड्यानंतर महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ. जोशी यांनी दिली.

या टीमने केली शस्त्रक्रिया -

ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणाऱ्या टीममध्ये शल्यक्रिया विभागातील डॉक्टर विनीत कुमार, डॉक्टर रणजीत कांबळे, डॉक्टर पार्थ पटेल, हृदयशस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर कुंतल सुराणा, भूलतज्ज्ञ डॉक्टर तेजस्विनी जांबोटकर यांच्यासह डॉक्टर अमेय, डॉक्टर प्राजक्ता आणि परिचारिका तेजस्विनी गायकवाड आणि सहाय्यक भास्कर लहानगे यांचा समावेश होता, अशी माहिती शल्यक्रिया विभागाचे प्रमुख तथा अधिष्‍ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी दिली.

हेही वाचा - अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर राहणार नाही; वकिलाची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.