ETV Bharat / city

MNS Maha Aarti : 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मनसेची राज्यभर महाआरती.. भोंगे लावून करणार आरत्या - भोंगे लावून करणार आरती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी हाती घेतलेला मशिदींवरील भोंग्यांचा ( Loudspeaker On Mosque ) विषय राज्यात चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. मनसेकडून ३ मेचा अल्टिमेटम देण्यात आलेला असताना दुसरीकडे मनसेने राज्यभरात महाआरतीची ( MNS Maha Aarti ) तयारी सुरु केली आहे. ३ मे रोजीच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मनसेकडून भोंगे लावून आरत्या करण्यात येणार ( Aarti On Loudspeaker ) आहे.

3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मनसेची राज्यभर महाआरती.. भोंगे लावून करणार आरत्या

author img

By

Published : Apr 19, 2022, 3:26 PM IST

Updated : Apr 19, 2022, 7:46 PM IST

मुंबई : राज्यात सध्या भोंगे चर्चेत आहेत. सर्व मशिदींवरील भोंगे ( Loudspeaker On Mosque ) तीन तारखेपर्यंत उतरले नाही तर येणाऱ्या परिणामांना तयार रहा, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी दिला होता. आता हा वाद काही शांत होण्याच्या मार्गावर नाहीये. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी आज मनसे नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देखील याच मुद्द्यावर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला ( MNS Maha Aarti ) आहे. 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भोंगे लावून राज्यभर महाआरती करण्यात येणार आहे.

तीन तारखेला राज्यभर महाआरती : आजच्या या बैठकीबद्दल माहिती देताना मनसेचे प्रमुख नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, "आमचा तीन तारखेचा अल्टिमेटम आहे. या अगोदर त्यांनी भोंगे उतरवावे तीन तारखेला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आम्हीदेखील संपूर्ण राज्यभर भोंगे लावून महाआरतीचे आयोजन केले आहे. याला राज्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी योग्य तो प्रतिसाद देतील. एक तारखेला महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादेत राज ठाकरे यांची महासभा होणार आहे. या सभेत साहेब तुम्हाला अधिकची माहिती देतीलच," असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मनसेची राज्यभर महाआरती.. भोंगे लावून करणार आरत्या

आयोध्या दौरा राज ठाकरेंच्या सूचना :
पुढे बोलताना नांदगावकर म्हणाले की, "सोबतच राज ठाकरे यांनी पाच जूनच्या आयोध्या दौऱ्याबद्दल आम्हाला काही सूचना केल्या आहेत. त्या सूचना लक्षात घेऊन आम्ही काही त्रुटी राहिल्या होत्या त्या भरून काढणार आहोत. त्यासंदर्भात आमची काही पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा बैठक होईल. हा अयोध्या दौरा अधिकाधिक प्रभावी व यशस्वी करण्यावर आमचा भर असेल." असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आता बाळा नांदगावकर यांच्या म्हणण्यानुसार मनसेच्या तीन तारखेचा महा आरत्यांचा कार्यक्रम किती यशस्वी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

योगी आदित्यनाथ सरकारसोबत करणार चर्चा : यासंदर्भात माहिती देताना मनसेचे वरिष्ठ नेते नितीन सरदेसाई म्हणाले की, "हा दौरा अधिक यशस्वी व प्रभावशाली करण्याच्या दृष्टीने आजची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यभरातून आमचे हजारो कार्यकर्ते अयोध्येत येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच आम्ही अयोध्येत जाऊन पाहणी केली. परिस्थिती अनुकूल आहे का ? याचा आढावा घेतला. त्यानंतरच आम्ही तारीख ठरवली आहे. या दौऱ्याला येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेता व तिथं होणारी गर्दी बघता उत्तर प्रदेश प्रशासनाशी चर्चा करणं आवश्यकच आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात आम्ही यासंदर्भात योगी प्रशासनाशी निश्चित चर्चा करू." असं सरदेसाई यांनी म्हटले आहे.

रेल्वे राज्य मंत्र्यांशी करणार चर्चा : पुढं बोलताना सरदेसाई म्हणाले की, "दौरा जाहीर झाल्यापासून अनेक कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यामुळे रेल्वेने जाणच आम्हाला योग्य वाटतं. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून दहा ते बारा रेल्वेगाड्यांची आवश्यकता लागणार आहेत. त्यासंदर्भात आम्हाला रेल्वे प्रशासनाशी देखील चर्चा करावी लागणार असून ही चर्चा मुंबईतील अधिकाऱ्यांची करून चालणार नाही. कारण, गाड्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री, रेल्वेचे डायरेक्टर यांच्याशीच करणं गरजेच आहे. त्यादृष्टीने आम्ही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी पत्रव्यवहार करत आहोत." असं नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : खबरदार..! विनापरवानगी भोंगे लावल्यास होणार कारवाई, नाशिक पोलीस आयुक्तांचा आदेश

Last Updated : Apr 19, 2022, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.