मुंबई - ओमायक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर (Omicron variant in maharashtra) मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातात. मात्र या चाचण्यांचा अहवाल यायला उशीर होत असल्याने आता रॅपिड पीसीआर चाचणी (Rapid PCR Corona Testing) केली जाणार आहे. या चाचणीचा अहवाल लवकर येत असल्याने तसेच त्याचे दर कमी केल्याने त्याचा फायदा प्रवाशांना होईल, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशलन एअरपोर्टकडून देण्यात आली आहे. दरम्यान हे दर कमी करण्यासाठी पालिकेने विनंती केली होती त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रॅपिड आरटी-पीसीआर चाचणी (Rapid PCR Corona Testing)-
जगभरात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटमुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या विमानतळावर आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल यायला उशीर लागतो. यामुळे प्रवाशांना तो अहवाल येईपर्यंत विमानतळावर थांबावे लागत होते. आता चाचण्यांचा अहवाल लवकर यावा यासाठी मुंबई विमानतळावर रॅपिड पीसीआर (Rapid PCR Corona Testing) चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे शुल्क आधी ४,५०० रुपये इतके होते हे दर कमी करून आता ३,९०० रुपये इतके करण्यात आले आहेत. या चाचणीमुळे अहवाल लवकर येत असल्याने प्रवाशांचा वेळ वाचत आहे. रॅपिड पीसीर चाचणीसोबत ६०० रुपयांमध्ये आरटीपीसीर चाचणीही प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. रॅपिड पीसीआर चाचणीसाठी एअरोड्रॉमने १०० नोंदणी काउंटर आणि ६० सॅम्पलिंग बूथ सुरु केले आहेत. ज्यात १०० रॅपिड पीसीआर मशीनचा समावेश आहे. रॅपिड पीसीआर चाचणी शुल्क कमी केल्याने प्रवाशांना कोविड-19 चाचणीचा कमीत कमी खर्चात लाभ घेता येईल आणि त्यांना सुरक्षित प्रवास करता येईल, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पालिकेककडून ६०० रुपयांत चाचण्या (Omicron variant RT-PCR Test) -
परदेशातून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतल्याची किंवा ७२ तासांमधील आरटीपीसीआर (Omicron variant RT-PCR Test) चाचणी निगेटिव्ह असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाला द्यावी लागते. इतर प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. त्यासाठी आयसीएमआर आणि राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दरात म्हणजेच ६०० रुपये शुल्क घेतले जाते. विमानतळावर रॅपिड पीसीआर ही चाचणी केली जात आहे. ही चाचणी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दरामध्ये होत आहे. ज्या प्रवाशांकडे पैसे आहेत ते प्रवासी त्या चाचण्या करतात. ज्या प्रवाशांनकडे पैसे कमी असतील त्यांच्यासाठी पालिकेने ६०० रुपयात आरटीपीसीआर (Omicron variant RT-PCR Test) चाचणी उपलब्ध करून दिली आहे. रॅपिड चाचण्यांचे दर ४५०० रुपये इतके होते. पालिकेच्या आढावा बैठकीत यावर चर्चा झाली त्यानंतर केंद्र सरकारला दर कमी करण्याची विनंती केली. त्यानुसार आता ३९०० रुपयांमध्ये ही चाचणी केली जात आहे. पालिकेने केलेल्या प्रयत्नामुळे या चाचण्यांचे दर कमी झाले आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
७ दिवस सक्तीचे होम क्वारंटाईन -
जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचा प्रसार सुरु झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाबाहेरून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत का, गेल्या ७२ तासांमधील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आहे का याची तपासणी केली जाते. तसेच प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातात. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस सक्तीचे होम क्वारंटाईन आहे. याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून प्रवाशांना दिली जाते. ७ दिवस क्वारंटाईन असताना प्रवासी क्वारंटाईन नियमांचे पालन करतात का, याची तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी, विचारपूस केली जाते. जे प्रवासी विमानतळावर चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळून येतात त्यांना रुग्णालयात दाखल केले जाते. सात दिवसांनी त्यांची पुन्हा चाचणी करून निगेटिव्ह अहवाल आल्यास त्यांना घरी सोडून त्यांना ७ दिवस होम क्वारंटाईन केले जाते, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
रॅपिड पीसीआर चाचण्या (Rapid PCR Corona Testing)-
कोरोनाची लागण झाली आहे का याची माहिती आरटीपीसीआर चाचण्या केल्यावर मिळते. या चाचण्यांचा अहवाल यायला काही तासांचा अवधी लागतो. मात्र रॅपिड पीसीआर (Rapid PCR Corona Testing) चाचण्यांचा अहवाल आरटीपीसीआर चाचण्यांच्या पेक्षा कमी वेळात प्राप्त होतो. या चाचण्यांमुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत रावते लागत नाही. त्या प्रवाशाला इतर विमानाने जायचे असल्यास तो त्या विमानाने प्रवास करायला मोकळा होतो, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.