ETV Bharat / city

Omicron Death In Maharashtra : भारतात ओमायक्रॉनचा पहिला बळी; पिंपरी-चिंचवडमध्ये हृदयविकाराने मृत्यू झालेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह - नायजेरियातून पुण्यात आलेला प्रवासी ओमायक्रॉन लागण

नायजेरियातून पुण्यात आलेल्या प्रवाशाचा २८ डिसेंबर रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याच्या कोरोना तपासणीत तो रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आज आला आहे. पिंपरी चिंचवड येथे हा मृत्यू ( Omicron Death In Maharashtra ) झाला.

ओमायक्रॉन
ओमायक्रॉन
author img

By

Published : Dec 30, 2021, 9:59 PM IST

Updated : Dec 30, 2021, 11:34 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना पुन्हा फोफावला असून, आज दिवसभरात सुमारे पाच हजार 368 तर ओमायक्रॉनच्या 198 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड येथे ओमायक्रॉनचा पहिल्या मृत्यूची नोंद झाली ( Omicron Death In Maharashtra ) आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

नायजेरियातून आला प्रवासी

पिंपरी - चिंचवड येथे मृत्यू झालेला रुग्ण हा नायजेरियातून आला होता. त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने २८ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. आज त्या ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

18 हजार 217 ऍक्टिव्ह रुग्ण

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. आज 5 हजार 368 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या 66 लाख 70 हजार 754 पर्यंत पोहोचला आहे. तर 1193 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 07 हजार 330 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.55 टक्के इतका आहे. दिवसभरात 22 रुग्णांचा आज मृत्यू झाला. मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 88 लाख 87 हजार 303 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 09.68 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 89 हजार 251 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहे. 18 हजार 217 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई महापालिका - 3555
ठाणे पालिका - 37
ठाणे मनपा - 263
नवी मुंबई पालिका - 280
कल्याण डोबिवली पालिका - 73
वसई विरार पालिका - 100
नाशिक - 31
नाशिक पालिका - 47
अहमदनगर - 14
अहमदनगर पालिका - 12
पुणे - 99
पुणे पालिका - 307
पिंपरी चिंचवड पालिका - 74

बाधितांचे अहवाल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील
राष्ट्रीय विज्ञान संस्थेने ओमायक्रॉनबाबत दिलेल्या अहवालानुसार, आज दिवसभरात ओमायक्रॉनचे 198 रुग्ण आढळून आले. मुंबईतील 190, पुण्यातील 4, सातारा, नांदेड आणि पिंपरी चिंचवड भागात अनुक्रमे 1 रुग्णांचा समावेश आहे. 30 जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. त्यापैकी एका रुग्णांचा मृत्यू झाला. ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 450 इतकी झाल्याचे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

आजपर्यंत 1230 प्रवाशांची जनुकीय चाचणीसाठी नमुने
1 डिसेंबरपासून आजपर्यंत 1 लाख 99 हजार 559 प्रवासी मुंबईत उतरले. एकूण 39 हजार 354 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 217 आणि इतर देशातील 94 अशा एकूण 311 जणांची आरटीपीसीआर तर आजपर्यंतच्या 1230 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 112 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

ओमायक्रॉनचे रुग्ण
मुंबई - 327
पिंपरी चिंचवड - 26
पुणे ग्रामीण - 18
पुणे मनपा - 12
ठाणे मनपा - 12
नवी मुंबई - 7
कल्याण - डोंबिवली - 7
पनवेल - 7
नागपूर - 6
सातारा - 6
उस्मानाबाद - 5
वसई-विरार, नांदेड - प्रत्येकी 3
औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी-निजामपूर मनपा - प्रत्येकी 2
लातूर, अहमदनगर, मीरा-भाईंदर, अकोला कोल्हापूर - प्रत्येकी 1

Last Updated : Dec 30, 2021, 11:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.