मुंबई - शहरातील आझाद मैदानावर एनआरसी आणि सीएए विरोधात आयोजित केलेल्या इन्कलाब मोर्चात बोलताना विद्यार्थी नेता उमर खालिद याने केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पाकिस्तानकडे शोएब अख्तर होता जो जोरात चेंडू फेकत असे. मात्र, आमच्याकडे त्याच्याहीपेक्षा जोरात फेकणारे नरेंद्र मोदी आहेत, अशी टीका विद्यार्थी नेता उमर खालिद याने केली.
हेही वाचा... 'कावळ्याच्या शापाने काही गुरं मरत नाहीत'
उत्तर प्रदेशमधील घटना सुन्न करणारी आहे. अजय सिंग बिष्त म्हणजेच योगी हे ढोंगी आहेत. उत्तरप्रदेशमध्ये 30 हजार लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. 20 लोकांना मारून टाकले आहे. एकाला पण पायाला गोळी लागली नाही. सर्वांच्या छातीला गोळ्या लागल्या आहेत. योगी गुंड आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बळाचा वापर विरोध दाबून टाकण्याच्या प्रयत्न केला जात आहे, असे आरोप आणि टीका यावेळी बोलताना उमर खालिद याने केली.
हेही वाचा... भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिवस : व्हॉट्सअपच्या 250 ग्रुपऍडमिनला लेखी नोटिसा
मोदी-शाह ही जोडगोळी किती फेकणारी आहे, हे काही दिवसांपूर्वी समजले. अमित शाह हे बोलत होते की, एनआरसी सगळीकडे लागू करणार पण आता पलटू लागले आहेत. तसेच आता एनपीआर घेऊन आले आहेत. एनआरसी आणि एनपीआरचा काही घेणे देणे नाही, असे शाहांनी एका मुलाखतीत सांगितले. मात्र 2010 मध्ये एनपीआर झाले आणि आता होणारे एनपीआर हे वेगळे असल्याचे, उमर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा... लातूरात महिलांचा एल्गार : अवैध दारूविक्री कायमची बंद करा, अन्यथा..