ETV Bharat / city

वृद्ध महिलेवर १४ वार करून निर्घूण हत्या ; चेंबूरमधील घटना उघडकीस

author img

By

Published : Jul 14, 2020, 6:35 PM IST

चेंबूर येथील एका 70 वर्षीय महिलेची डोक्यात धारदार शस्त्राने 14 वार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. अंजनाबाई धोंडीबा पाटील असे या वृद्ध महिलेचे नाव असून त्या चेंबूरच्या पेस्टम सागर एसआरए इमारतीत वास्तव्यास होत्या.

mumbai crime
चेंबूर येथील एका 70 वर्षीय महिलेची डोक्यात धारदार शस्त्राने 14 वार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली.

मुंबई - चेंबूर येथील एका 70 वर्षीय महिलेची डोक्यात धारदार शस्त्राने 14 वार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. अंजनाबाई धोंडीबा पाटील असे या वृद्ध महिलेचे नाव असून त्या चेंबूरच्या पेस्टम सागर एसआरए इमारतीत वास्तव्यास होत्या.

अंजनाबाई घरात जखमी अवस्थेत पडलेल्या पहाताच पुतण्याने तत्काळ घाटकोपरच्या पालिका रुग्णालयात हालवले. यावेळी त्याने अंजनाबाई बाथरूममध्ये पडल्याचे डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी तपासणी करून संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर टिळक नगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन झडती घेतली. यावेळी सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यावरून अनोळखी व्यक्तीने धारदार शस्त्रांनी वार करून महिलेचा गळा आवळल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केलाय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.