ETV Bharat / city

लोकलचा पास मिळावा यासाठी रेल्वे स्थानकांवर 'ऑफलाइन' प्रक्रिया

ज्यांनी कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, त्यांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी सातत्याने मागणी होत होती. त्याची दखल घेवून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सकारात्मक निर्णय जाहीर केला आहे.

लोकल पास प्रोसेस
लोकल पास प्रोसेस
author img

By

Published : Aug 10, 2021, 7:23 PM IST

Updated : Aug 10, 2021, 10:35 PM IST

मुंबई - मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना दिनांक १५ ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार, नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाइन पडताळणी प्रक्रिया उद्या बुधवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२१पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५३ रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) १०९ स्थानकांवर सकाळी ७ ते रात्री ११पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये सुरू होणार आहे, त्याआधारे नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास पास रेल्वेकडून देण्यात येईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

हेही वाचा - दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी मिळणार ओळखपत्र - पालिका आयुक्त

ऑफलाइन प्रक्रिया सुरू

याअनुषंगाने तपशिलवार माहिती देताना चहल यांनी सांगितले, की ज्यांनी कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, त्यांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी सातत्याने मागणी होत होती. त्याची दखल घेवून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सकारात्मक निर्णय जाहीर केला आहे. कोविड लसीकरण पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांना दिनांक १५ ऑगस्ट २०२१पासून लोकल रेल्वे प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी ऑनलाइन अॅपद्वारे तसेच ऑफलाइन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे. अॅप तयार करून ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही काही कालावधीत सुरू होईल. तत्पूर्वी उद्या, दिनांक ११ ऑगस्ट २०२१पासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे, जेणेकरून सर्वसामान्य मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, असे चहल यांनी नमूद केले.

'नागरिकांनी योग्य सहकार्य करावे'

रेल्वे मासिक प्रवास पास देण्याची ही ऑफलाइन प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी निरंतर सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या या व्यवस्थेमध्ये सर्व नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे, असे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

हेही वाचा - लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाला हिरवा कंदील - मंत्री विजय वडेट्टीवार

रेल्वे पास मिळावा यासाठी नियमावली -

  • १. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ५३ उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाइन पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील स्थानकांचादेखील समावेश आहे. या सर्व स्थानकांवर मिळून तिकिट खिडकी नजीक ३५८ मदत कक्ष असतील.
  • २. मुंबई महानगरासह आजूबाजूची सर्व शहरे मिळून म्हणजे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) एकूण १०९ लोकल रेल्वे स्थानकांवर ही ऑफलाइन पडताळणी सुविधा उपलब्ध असेल.
  • ३. ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत (हार्ड कॉपी), त्यासोबत छायाचित्र ओळखपत्र पुरावा असे दोन्ही दस्तावेज सोबत घेवून घरानजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे. हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्र जरी नसेल, तरी रेल्वे स्थानकावर, रेल्वे प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात येईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
  • ४. रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीजवळ आल्यानंतर, तेथे बृहन्मुंबई महानगरपालिका (अथवा संबंधित महानगरपालिका/नगरपरिषद/स्थानिक स्वराज्य संस्था) यांच्याद्वारे स्थापन केलेले मदत कक्ष (हेल्प डेस्क) असतील. हे मदत कक्ष सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ अशा सलग दोन सत्रांमध्ये सुरू राहतील.
  • ५. मदत कक्षावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी (किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी) हे संबंधित नागरिकाच्या कोविड लसीकरण अंतिम प्रमाणपत्राची (फायनल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट-दुसरा डोस) वैधता कोविन अॅपवर तपासतील. तसेच छायाचित्र ओळखपत्र पुरावादेखील तपासतील. पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रे वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर, कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवरदेखील विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल.
  • ६. सदर शिक्का मारलेले कोविड अंतिम प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर करावे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येईल. मात्र, सदर पास आधारीत प्रवासाची सुविधा ही दिनांक १५ ऑगस्ट २०२१पासूनच वैध असेल. त्यापूर्वी नाही.
  • ७. कोविड लसीचा एकही डोस न घेतलेल्या किंवा फक्त एकच डोस घेतला असल्याच, अशा नागरिकांना सद्यस्थितीत उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा नसेल.
  • ८. मुंबई महानगर तसेच मुंबई प्रदेशातील लोकसंख्या लक्षात घेवून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर जेवढ्या तिकिट खिडक्या असतील, तेवढ्याच संख्येने मदत कक्ष देखील असतील. तसेच सकाळी ७ ते रात्री ११ अशी तब्बल १६ तास पडताळणी सुविधा सुरू राहणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी घरानजीकच्या रेल्वे स्थानकांवर जावे. मात्र विनाकारण गर्दी करू नये, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
  • ९. जर कोणीही बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्र आणण्याचा प्रयत्न केला, तर अशा व्यक्तिीविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा/आपत्कालीन व्यवस्थापन कायदा/भारतीय दंडविधान संहिता यानुसार कठोर पोलीस कार्यवाही करण्यात येईल, याची सक्त नोंद घ्यावी, असेही प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
  • १०. अत्यावश्यक सेवेतील शासकीय/निमशासकीय आणि इतर कर्मचारी यांना सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसारच, म्हणजेच कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असोत वा नसोत, त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा सुरू राहील. त्यामुळे त्यांनी नियमित पद्धतीने उपनगरीय रेल्वे प्रवास करावा, असे कळविण्यात येत आहे.
  • ११. मुंबई महानगर प्रदेशातील इतर सर्व महानगरपालिका/नगरपरिषद/स्थानिक स्वराज्य संस्था यांनाही याचप्रकारे उद्यापासून व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्या-त्या भागातील रहिवाशांनी नजीकच्या रेल्वे स्थानकावर जावून वैध प्रक्रिया पार पाडावी.
  • १२. शासनाकडून ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. तथापि, त्यास आणखी काही कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ऑफलाइन प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता, टप्प्या-टप्प्याने तसेच ज्यांना अधिक आवश्यकता आहे, त्यांना प्राधान्य देवून पडताळणी पूर्ण करून मासिक पास प्राप्त करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. ऑफलाइन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, मासिक पास प्राप्त करणे अतिशय सुलभ होणार आहे. ती व्यवस्थादेखील पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहील.
  • १३. या संपूर्ण प्रक्रियेची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर)देखील नेमले असून त्यांच्यासह आवश्यक कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Last Updated : Aug 10, 2021, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.