मुंबई - मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांचे शिवसेनेसोबत संबंध ताणले असतानाही आश्चर्यकारकपणे त्यांना प्रधान सचिव पदी बढती देण्यात आली आहे. 'आरे' मधल्या नियोजित कारशेडला विरोध करत मंत्री आदित्य ठाकरे यांनी भिडे यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. मात्र, आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आणि आदित्य ठाकरे यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भिडे यांची प्रधान सचिव पदी बढती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेही वाचा - नाराज आमदारांना बरोबर घेऊन काम करणार; काँग्रेस मंत्र्यांनी घेतली राहुल, सोनिया यांची दिल्लीत भेट
काही दिवसांपूर्वीच दक्षिण मुंबईतल्या गिरगावमध्ये मेट्रोच्या बांधकामाविरोधात शिवसेनेने आंदोलन केले होते. यावेळी अश्विनी भिडे यांच्या कार्यशैलीवर शिवसैनिकांनी टीका केली होती. दरम्यान, वृक्षतोड न करता आरे व्यतिरिक्त मेट्रोचे कारशेड उभारण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली होती. यावर ही मागणी धुडकावून लावत भिडे यांनी वृक्षतोडीला पर्याय नसल्याचे सांगितले होते. आता भिडे यांची बढती झाली असली तरी सध्या त्या मेट्रोच्या व्यवस्थपकीय संचालक पदी कायम राहणार असल्याची माहिती मिळत आहे.