ETV Bharat / city

'तिकडून शरद पवार येताहेत म्हटल्यावर इकडून मी येणारच'

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांची मुदत येत्या मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे या सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. 'माझी राज्यसभेची उमेदवारी निश्चित आहे. मात्र, भाजपची एक जागा धोक्यात' असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

author img

By

Published : Feb 29, 2020, 10:29 AM IST

रामदास आठवले Ramdas Athawale
रामदास आठवले

मुंबई - महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांची मुदत येत्या मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे या सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र, या होणाऱ्या निवडणुकीत भाजपला एका जागेचा धोका आल्याचे सूतोवाच भाजप खासदार आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. महाविकासआघाडी एकत्रित आल्याने भाजपला त्याचा फटका बसणार आहे. मात्र मी सध्या केंद्रात मंत्री आहे. तसेच समोरून शरद पवार येत असल्याने माझी उमेदवारी निश्चित असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

माझी राज्यसभेची उमेदवारी निश्चित, पण भाजपची एक जागा धोक्यात... रामदास आठवले

हेही वाचा... '....तर मुस्लीम आरक्षणालाच आमचा विरोध राहील'

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अ‌ॅड. माजिद मेमन यांची राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत संपत आहे. तर कॉंग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत आणि भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले आणि भाजप पुरस्कृत अपक्ष खासदार संजय काकडे यांचीही मुदत येत्या 2 मार्चला संपत आहे.

येत्या 26 मार्चला या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येकी जागेसाठी 37 मतांचा कोटा सदस्य निवडीसाठी असणार आहे. यात संख्याबळाच्या जोरावर चार जागा या महाविकास आघाडीच्या वाट्याला येऊ शकतात. दोन जागा भाजपच्या वाट्याला येऊ आहेत. त्यापैकी दोन जागा राष्ट्रवादीकडे आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अद्याप कोणीही आपला राज्यसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, राष्ट्रवादीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा... मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा कायदा लवकरच, नवाब मलिकांची विधानपरिषदेत घोषणा

राजकीय पक्षांचे संख्याबळ...

महाविकासआघाडीकडे एकूण 170 मते आहेत. विधानसभेत विश्वासमत ठरावात एमआयएम, मनसे आणि कम्युनिस्ट पक्षाचे आमदार तटस्थ राहिले होते. भाजपकडे स्वत:ची 105 आणि इतर 9 अशी एकूण 114 मते आहेत. खासदार निवडून आणण्यासाठी 37 मतांची गरज आहे.

विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ...

भाजप - 105, शिवसेना - 56, राष्ट्रवादी कॉंग्रेस - 54, कॉंग्रेस - 44, बहुजन विकास आघाडी – 03, समाजवादी पक्ष – 02, एमआयएम - 02, प्रहार जनशक्ती पक्ष – 02, मनसे - 01, सीपीआयएम - 01, स्वाभिमानी पक्ष - 01, रासप - 01, जनसुराज्य - 01, क्रांतीकारी शेतकरी पक्ष – 01 आणि अपक्ष -13 असे पक्षीय बलाबल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.