मुंबई - महानगरपालिका यंदाच्या गणेश विसर्जनासाठी सज्ज झाली असून 445 विसर्जन स्थळं निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी सुमारे 23 हजार कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत ही संख्या तिप्पट आहे. यंदाचा गणेशोत्सव नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
महापालिका क्षेत्रातील श्री गणेश मूर्ती विसर्जन स्थळांची आकडेवारी
कृत्रिम तलाव संख्या-168 , मूर्ती संकलन केंद्र- 170, फिरती विसर्जन स्थळे -37, नैसर्गिक विसर्जन स्थळे -70 एकूण विसर्जन स्थळे 445
स्टील प्लेट -८९६ ,
नियंत्रण कक्ष -७८,
जीव रक्षक -६३६,
मोटर बोट -६५,
प्रथमोपचार केंद्र -६९, रुग्णवाहिका संख्या- ६५, स्वागतकक्ष -८१ ,
तात्पुरती शौचालय- ८४,
निर्माल्य कलश -३६८
निर्माल्य वाहन /डंपर/ टेम्पो- ४६७(तसेच आवश्यकतेनुसार त्या त्या भागात वाहन व्यवस्था करण्यात आली आहे)
फ्लड लाईट - २७१७
सर्च लाईट -८३
विद्युत व्यवस्था- आवश्यकतेनुसार
संरक्षण कठडे -आवश्यकतेनुसार
निरीक्षण मनोरे- ४२
जर्मन तरफा -४५
मनुष्यबळ(कर्मचारी)- १९५०३
मनुष्यबळ (अधिकारी)- ३९६९
पालिकेचे आवाहन
• घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन शक्यतो घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे.
• मुंबई शहरात एकूण ७० नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध आहे. १ ते २ मीटर अंतरातील गणेश भक्तांनी मूर्ती नैसर्गिक विसर्जन स्थळी उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे द्यायच्या आहेत.
• नैसर्गिक विसर्जन स्थळांवर महापालिकेद्वारे अतिरिक्त मनुष्यबळ आणि मूर्ती संकलनाची शिस्तबद्ध व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
• नैसर्गिक विसर्जन स्थळांवरील गर्दी कमी होण्यासाठी महापालिकेच्या २४ विभागांमध्ये सुमारे १६८ कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्थळांवर जाण्यास मनाई असल्याने या कृत्रिम तलावाचा वापर लगतच्या भाविकांनी करणे बंधनकारक आहे.