मुंबई - राज्यात आज 15 हजार 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 33 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 57 लाख 46 हजार 892 इतकी झाली आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 53 लाख 95 हजार 370 इतकी झाली आहे. तसेच राज्यात गेल्या 24 तासांत 184 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका बाजूला कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे.
कोणत्या जिल्ह्यात 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची नोंद -
मुंबई महानगरपालिकाा - 666
ठाणे - 155
ठाणे महानगरपालिका - 115
कल्याण डोंबिवली महापालिका - 114
पालघर - 182
वसई विरार - 126
रायगड - 326
नाशिक - 1700
नाशिक मनपा - 358
अहमदनगर - 792
पुणे - 621
पुणे मनपा - 194
पिंपरी चिंचवड महानगरपालिका - 230
सोलापूर - 436
सातारा - 1713
कोल्हापूर - 1442
कोल्हापूर मनपा - 396
सांगली - 741
सांगली मनपा - 103
सिंधुदुर्ग - 590
रत्नागिरी - 557
औरंगाबाद - 137
उस्मानाबाद - 333
बीड - 494
अमरावती - 218
यवतमाळ - 212
वाशिम - 164
नागपूर - 110
नागपूर मनपा - 198
हेही वाचा - हेरगिरी प्रकरणावर गृहमंत्र्यांचा खासदार संभाजीराजेंना फोन; संभाजीराजेंनी ट्वीट करून दिली माहिती