ETV Bharat / city

#विज्ञान दिन : 'या' शास्त्रज्ञाच्या कार्याचा गौरव म्हणून साजरा होतो 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' - चंद्रशेखर व्यंकटरमन

२८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी 'रामन इफेक्टचा' शोध लागला. या शोधासाठी प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ सी.व्ही रमन यांना १९३० साली भौतिक शास्त्राचा नोबल पुरस्कार मिळाला होता.

National Science Day C. V. Raman
#राष्ट्रीय विज्ञान दिवस
author img

By

Published : Feb 28, 2020, 10:42 AM IST

Updated : Feb 28, 2020, 11:40 AM IST

मुंबई - २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी 'रामन इफेक्टचा' शोध लागला. या शोधासाठी प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ सी.व्ही रामन यांना १९३० साली भौतिक शास्त्राचा नोबल पुरस्कार मिळाला होता. रामन यांच्या विज्ञानातील भरीव कामगिरीनिमित्त नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशनने २८ फ्रेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याची विनंती केली आणि २८ फेब्रुवारी १९८७ ला पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून आजतागयत भारतात दरवर्षी विज्ञान दिवस साजरा केला जातो.

प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ सी.व्ही रमन यांना 'ईटीव्ही भारत'कडून शत् शत् नमन !

१९२१ साली रामन यांना समुद्राचे पाणी पाहून ते निळे का दिसते ? हा प्रश्न पडला होता. याबाबत त्यांची नजर जॉन विल्यम रैले यांच्या तर्कावर गेली. आकाशाच्या प्रतिबिंबामुळे समुद्राच्या पाण्याचा रंग निळा दिसतो असे विल्यम यांचे तर्क होते. मग आकाश राखाडी रंगाचे होते, तेव्हा पाणी खराडी रंगाचे का दिसत नाही? हा प्रश्न रामन यांना पडला. त्यामुळे जॉन विल्यम यांच्या मताशी सहमत नसलेले रामन हे स्वतः हे गुढ उकलण्याच्या तयारीला लागले.

National Science Day C. V. Raman
२८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी लागला 'रमन इफेक्टचा' शोध...

हेही वाचा... विज्ञान दिन विशेष : जाणून घ्या, शत्रुला धडकी भरविणाऱ्या महिला शास्त्रज्ञाची कामगिरी

१९२३ साली रामन यांनी काही उपकरणांसह पाणी आणि प्रकाशाच्या विकिरणांचा अभ्यास केला. समुद्राच्या निळाईचे कारण हे प्रकाशाचे पाण्याच्या रेणुंमुळे होणारे विकिरण असल्याचे त्यांनी दाखवून दिले. यानंतर रामन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगामध्ये परावर्तीत होण्याबाबत संशोधन केले आणि ते ज्या निष्कर्षावर पोहोचले तो 'रामन इफेक्ट' संबोधला गेला.

१९२८ साली 'रामन इफेक्टचा' शोध लागला. या शोधासाठी रामन यांना १९३० सालचा भौतिक शास्त्राचा नोबल पुरस्कार मिळाला. रामन यांच्या विज्ञानातील या भरीव कामगिरीनिमित्त २८ फ्रेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.

National Science Day C. V. Raman
भौतिक शास्त्रज्ञ सी.व्ही रमन यांना १९३० साली भौतिक शास्त्राचा नोबल पुरस्कार मिळाला...

हेही वाचा... मराठी भाषा गौरव दिन : सरकारच्या कारभाराबद्दल खान्देशी बोलीभाषा 'अहिराणी'त प्रतिक्रिया...

सी.व्ही रामन यांच्याद्वारे निर्मित रामन स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर आज देशविदेशातील रसायन प्रयोग शाळांमध्ये होतो आहे. एव्हढेच नव्हे तर, त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी देखील करण्यात आला आहे.

विज्ञान क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी, त्याचबरोबर युवा वैज्ञानिकांचे प्रेरणास्थान असलेले सी.व्ही रामन यांना 'ईटीव्ही भारत'कडून शत् शत् नमन !

Last Updated : Feb 28, 2020, 11:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.