ETV Bharat / city

Shiv Sena : आता रवी म्हात्रे हेच उद्धव ठाकरेंचा 'राईट हँड' ; तर मिलिंद नार्वेकरांवर ठाकरेंची नाराजी - Uddhav Thackeray right hand

शिवसेनेतील बंडखोरीनंतर अनेकांनी शिंदे गटाला समर्थन देत उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील शिंदे यांच्यासोबत सलगी वाढवण्याचा प्रयत्न (Uddhav Thackerays displeasure with Milind Narvekar) केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू रवी म्हात्रे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी (Ravi Mhatre is active in Shiv Sena) दिली.

Ravi Mhatre
शिवसेनेत रवी म्हात्रे सक्रिय
author img

By

Published : Sep 23, 2022, 12:54 PM IST

मुंबई - शिवसेनेतील बंडखोरीनंतर मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेच्या अनेकांनी शिंदे गटाला समर्थन देत उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील शिंदे यांच्यासोबत सलगी वाढवण्याचा प्रयत्न (Uddhav Thackerays displeasure with Milind Narvekar) केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना चार हात लांब ठेवून त्यांच्याऐवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू रवी म्हात्रे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी (Ravi Mhatre is active in Shiv Sena) दिली.

शिवसेनेत मोठी फूट - बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीमुळे गळचेपी होते, असा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुखांविरोधात बंड पुकारला. शिवसेनेत यानंतर मोठी फूट पडली. आमदार खासदार पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले. शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू झाले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे (Shiv Sena and Uddhav Thackeray) यांचे राईट हॅन्ड समजले जाणारे मिलिंद नार्वेकर पक्षापासून लांब राहिले. शिवाय शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी नार्वेकर यांनी जोर लावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेल्याचे वृत्त समोर आले.

नार्वेकर उद्धव ठाकरेंची नाराजी - मुख्यमंत्री शिंदे यांनीही मिलिंद नार्वेकर यांच्या घरी भेटीगाठी घेतल्या. मिलिंद नार्वेकर आम्हाला उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत, असे आरोप आजपर्यंत अनेकांनी केले आहेत. शिंदे यांच्या बंडानंतरही नार्वेकरांकडे अंगुलीनिर्देश करण्यात आले. गणेशोत्सवात त्याच नार्वेकर यांच्या घरी मुख्यमंत्री आणि बंडखोर नेते यांनी गणेश दर्शन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्यावर नाराज होते. शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात नार्वेकर यांच्याऐवजी रवी म्हात्रे हे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे फाईल घेऊन उभे असल्याचे दिसले. त्यामुळे उद्धव ठाकरेंची नाराजी प्रकर्षाने दिसून आली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत सक्रिय असल्याने शिवसैनिकांशी त्यांचा चांगल्याप्रकारे संपर्क आहे. रवी म्हात्रे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे होते. त्या काळात बाळासाहेबांकडून येणारे निरोप हे म्हात्रेंकडूनच यायचे. बाळासाहेब ठाकरे यांना फोन केला तर, तो आधी रवी म्हात्रे घेत असत.

बाळासाहेब ठाकरेंसोबत रवी म्हात्रेंची जवळीक - आमदार, खासदार, शाखाप्रमुख आपल्या समस्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी रवी म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचे. याशिवाय, रवी म्हात्रे हेच बाळासाहेब ठाकरेंच्या सर्व कार्यक्रमांचे नियोजन करायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मध्यंतरीच्या काळापासून रवी म्हात्रे हे संघटनेत फारसे सक्रिय नव्हते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर रवी म्हात्रे पुन्हा सक्रिय झाले. शिवसेना भवनातील त्यांचा वावर लक्षणीयरित्या वाढला आहे. अशातच नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बंडानंतर लांब राहिल्याने आता उद्धव ठाकरे यांचे सहाय्यक म्हणून म्हात्रे प्रामुख्याने दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात मिलिंद नार्वेकर यांच्याऐवजी रवी म्हात्रे हेच उद्धव ठाकरे यांचा 'राईट हँड' (now Ravi Mhatre is Uddhav Thackeray right hand) असतील, अशी चर्चा शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळात सुरू (Ravi Mhatre in Shiv Sena) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.