ETV Bharat / city

पश्चिम मार्गावर ताशी 100 किमी वेगाने धावणार रेल्वे! - railway

नव्या यंत्रणेमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेसचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. ज्या स्थानकावर एक्स्प्रेसचा वेग ताशी 50 किमी होता, तिथे आता एक्स्प्रेसचा वेग ताशी 100 किमी होणार आहे.

पश्चिम मार्गावर ताशी 100 किमी वेगाने धावणार रेल्वे!

author img

By

Published : Mar 26, 2021, 10:48 PM IST

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता जलद होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर असलेली जुनी सिग्नल यंत्रणा बदलून त्या जागी नवीन संगणाकावर आधारित इलेक्ट्रॉनिक इंटरलाॅकिंग सिस्टम बसविली जात आहे. त्यामुळे एक्स्प्रेसचा वेग ताशी 50 किलोमीटरऐवजी ताशी 100 किलोमीटर होणार आहे.

अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा
अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा

अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 40 रेल्वे स्थानकांवर युनिव्हर्सल फेल सेफ ब्लॉक इन्व्हेस्टमेंट संगणकाधारित इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम बसविण्यात आलेली आहे. या नव्या यंत्रणेमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेसचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. ज्या स्थानकावर एक्स्प्रेसचा वेग ताशी 50 किमी होता, तिथे आता एक्स्प्रेसचा वेग ताशी 100 किमी होणार आहे. एक्स्प्रेसच्या वेगासह सुरक्षेवरही भर देण्यात आलेला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.

अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा
अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा
४ हजार ५०४ सिग्नल बिघाडमध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्या आणि उपनगरीय लोकल धावतात. मात्र, सिग्नल यंत्रणेत होणारे वारंवार बिघाड यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वक्तशीरपणाबाबत बोलले जाते. गेल्या काही वर्षांत सिग्नल बिघाडाच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर तीन वर्षांत ४ हजार ५०४ सिग्नल बिघाड झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे रेल्वेच्या वेगावरसुद्धा मर्यादा आली होती. मात्र, आता युनिव्हर्सल फेल सेफ ब्लॉक इन्व्हेस्टमेंट संगणकाधारित इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे आता रेल्वे सिग्नल बिघाडाच्या घटना कमी होणार आहे. आणि रेल्वेचा वेगही वाढणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.