नागपूर - सलाईन गारगलिंगद्वारे आरटीपीसीआर टेस्टचा शोध लावण्याचे काम नागपूरच्या निरीच्या(राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था) च्या वैज्ञानिक यांनी केला आहे. विशेष म्हणजे याला आयसीएमआरनेसुद्धा मान्यता दिली आहे. याचा फायदा मोठ्या प्रमाणात अधिक सोप्या पद्धतीने कोरोना चाचणी करण्यासाठी होणार आहे. शिवाय तासोंतास लागणाऱ्या रांगापासूूून मुक्त होणार आहे. ही सोपी पद्धत आहे तरी काय हे जाणून घेऊया विशेष रिपोर्टमधून आणि यामुळे काय फायदा होणार हे सुद्धा जाणून घेऊयात...
यात आता कोरोनाच्या चाचणीसाठी नाक किंवा गळ्यातील नमुने घेण्याची गरज पडणार नाही. यासोबतच आता कोरोना टेस्टसाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज पडणार नाही. पाच एमएल असलेल्या एका टेस्ट ट्यूबमध्ये सलाईन द्रव्य असणार, हे सलाईन द्रव्य तोंडामध्ये घेऊन केवळ 15 सेकंड गळ्यात गार्गल, किंवा ज्या पद्धतीने मिठाचे गुराळे करतो त्याच पद्धतीने गार्गल करून परत त्याच छोट्या ट्यूबमध्ये परत सोडायचे आहे. यानंतर हा स्वॅब आरटीपीसीआर चाचणीकरिता तयार असल्याची माहिती निरीचे शास्त्रज्ञ क्रीष्णा खैरनार यांनी दिली.
हेही वाचा - टिळा लावते मी 'कुंकवा'चा : सोनालीने लावला नवऱ्याच्या 'कप्पाळीला टिळा'
हे नमुने घेण्यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची गरजच नाही
या सोप्या पद्धतीने स्वॅब घेण्यासाठी कुठल्याची आरोग्य कर्मचाऱ्याची गरज भासणार नाही. यापूर्वी गळ्यातून किंवा नाकातून घेतले जाणारे नमुने किंवा स्वॅब घेताना विशेष काळजी घ्यावी लागत होती. पण या सलाईन गारगल पद्धतीत एकतर सामाजिक अंतर ठेवून किंवा दुसरी टेस्ट करणारी व्यक्ती बाधित होण्याची मोठी भीती होती. यामुळे ही भीती कमी झाली आहे.
यात मेडिकल वेस्टला रोकथांब
हे नमुने घेताना यापासून वेस्ट काही होत नाही. एरवी नाक आणि गळ्यातील नमुने घेणारे प्लास्टिक वेस्ट ठरत होते. यासोबत अँटिजेन टेस्ट घेण्यासाठी लागणारे किटसुद्धा वेस्ट ठरत होते. पण या चाचणीत हे वेस्ट ठरणार नाही.
नमुने स्वतः घेता येणार, गर्दी थांबणार
या पद्धतीमध्ये कोरोनाचे नमुने घेण्यासाठी अडचण होणार नाही. कारण हे नमुने स्वतः घेता येणार आहेत. यासोबतच स्वॅब देण्यासाठी लांब रांगा लॅबसमोर लागलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. तासंतास या रांगेत सामाजिक अंतर पाळले जात नसल्याने कोरोना होण्याची भीती निर्माण होत होती. यामुळे बरेचदा सामान्य किंवा बाधित नसलेल्या व्यक्तींनासुद्धा बाधा होण्याची भीती वाढली आहे.
बफरिंग गरम करून आरटीपीसीआर टेस्ट होत असल्याचे याचे शोधकर्ते पर्यावरण आणि विषाणू जन्य विभागाचे वैज्ञानिक क्रीष्णा खैरनार यांनी सांगितले आहे. यामुळे कोरोनाची चाचणीसाठी स्वॅब घेण्याचा खर्चही कमी होणार आहे. यामुळे याचा फायदा अधिक होऊ शकणार असल्याचे खैरनार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - 'ई टीव्ही भारत'चे वृत्त ठरले खरे! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे केले होते भाकित