ETV Bharat / city

बावनकुळे नाही तर, लाखकुळे आले तरी, पवार साहेबांच्या पायावरच्या नखाची वाळूही उडणार नाही, जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट - Lakhkule

बावनकुळे नाही तर लाखकुळे आले तरी पवार साहेबांच्या पायावरच्या नखाची वाळूही उडणार नाही. 1990 नंतर शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय कोणाचेही राजकारण पूर्ण होत नाही. हे विरोधकांना चांगलेच ठाऊक आहे. शरद पवार यांच्यावर सातत्याने खोटेनाटे आरोप करण्यात आले. मात्र त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कोणताही परिणाम झाला नाही, असा टोला राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला आहे. ट्विटच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी हा टोला लगावला.

पवार साहेबांच्या पायावरच्या नखाची वाळूही उडणार नाही

author img

By

Published : Sep 7, 2022, 3:22 PM IST

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बारामतीचा दौरा केला. या दौऱ्यात शरद पवार जात असलेल्या मारुतीच्या मंदिरात जाऊन त्यांनी पूजाही केली. त्यांनी यावेळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ विजयी करून दाखवू असा विश्वासही व्यक्त केला. पण, 'बावनकुळे नाही तर लाखकुळे आले तरी साहेबांच्या पायावरच्या नखाची वाळूही उडणार नाही. 1990 नंतर शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय कोणाचेही राजकारण पूर्ण होत नाही. हे विरोधकांना चांगलेच ठाऊक आहे. शरद पवार यांच्यावर सातत्याने खोटेनाटे आरोप करण्यात आले. मात्र त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कोणताही परिणाम झाला नाही' असा टोला राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला आहे. ट्विटच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी हा टोला लगावला.

पवार साहेबांच्या पायावरच्या नखाची वाळूही उडणार नाही
पवार साहेबांच्या पायावरच्या नखाची वाळूही उडणार नाही

कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाताना शरद पवार बारामतीमध्ये असलेल्या श्री मारुतीच्या मंदिरात दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज भरतात. त्याच मंदिरात चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा गड जिंकू अशी प्रार्थना केली. त्यामुळे मंदिरातला श्री मारुती देखील हसत होता असा चिमटा बावनकुळे यांना जितेंद्र आव्हाड यांनी काढला आहे.

बावनकुळे काय म्हणाले होते - बारामती पवारांचा गड मानला जातो. परंतु देशात असे अनेक गड उद्धवस्त झाले आहेत. जेव्हा संघटन मजबूत होते, संघर्ष निर्माण करण्याची ताकद येते. त्यावेळी चांगले-चांगले गड उद्धवस्त झाले आहेत. गड कोणा एकाच्या मालकीचा राहत नाही. कोणाचे वर्चस्व राहत नाही. वेळेनुसार बदल होतो ( BJP will win in Baramati 2024 Lok Sabha ). हा देशाचा इतिहास आहे. त्यामुळे बारामतीचा गड २०२४ ला भाजपने जिंकलेला दिसेल ( 2024 Lok Sabha elections ), असा आशावाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वारंवार प्रशंसा करत असताना बारामती टार्गेट का, या प्रश्नावर बावनुकुळे म्हणाले होते की, एखाद्याने चांगले काम केले तर त्यांची प्रशंसा करण्यात गैर काय. परंतु बारामती मतदारसंघात अजूनही ४५ टक्के जनता उपेक्षित आहे. ओबीसी, मराठा, धनगर समाजाचे प्रश्न कायम आहेत. चार-दोन लोक मोठे झाले म्हणजे समाज मोठा होत नाही. उपेक्षित एकत्र आल्यावर संघर्ष निर्माण होतो.आणि हा संघर्ष विजयापर्यंत घेवून जातो. ते काम आम्ही करू. देशातील अनेक गड उद्धवस्त झाले. त्याचा निर्णय जनता घेत असते. डाॅ.अब्दुल कलाम यांचे व्हिजन पुढे घेवून जाण्याचे काम मोदी करत आहेत. देशाला सुरक्षित व मजबूत तेच करू शकतात, हे जनता जाणते. त्यामुळे असे अनेक किल्ले उद्धवस्त होतील. बारामती हा त्या दृष्टीने फार मोठा किल्ला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.