मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मुंबई ते मडगाव दरम्यान 300 फेऱ्यांच्या विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. खाली दिलेल्या तपशिलानुसार त्या चालवण्यात येणार आहेत.
मुंबई - मडगाव विशेष (150 फे-या)
01112 उत्सव विशेष एक्सप्रेस दि. 1 नोव्हेंबर ते 14 जानेवारी 2021 पर्यंत (75 फे-या) मडगाव येथून दररोज 6 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 5.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
01111 उत्सव विशेष एक्सप्रेस 2 नोव्हेंबर पासून 15 जानेवारी 2021 पर्यंत (75 फे-या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज 11.05 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.45 वाजता मडगावला पोहोचेल.
दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, पेडणे, थिवि आणि करमाळी या स्थानकात या गाडीला थांबे देण्यात आले आहेत. या गाडीची संरचना 1 प्रथम सह द्वितीय वातानुकूलित, 1 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान आणि 4 द्वितीय आसन श्रेणी असेल.
मुंबई - मडगाव विशेष ट्रेन (150 फेऱ्या)
01114 उत्सव विशेष एक्सप्रेस 2 नोव्हेंबर ते 15 जानेवारी 2021 पर्यंत 75 फेऱ्या होणार आहेत. मडगाव येथून दररोज 9.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 9.40 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
01113 उत्सव विशेष एक्सप्रेस 2 नोव्हेंबर ते 15 जानेवारी 2021 पर्यंत (75 फे-या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज 7.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 7 वाजता मडगावला पोहोचेल.
या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, पेडणे, थिवि आणि करमाळी स्थानकात थांबे देण्यात आले आहेत. या गाडीची संरचना 1 प्रथम सह द्वितीय वातानुकूलित, q द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान आणि 4 द्वितीय आसन श्रेणी असेल.
01111 आणि 01113 उत्सव विशेष ट्रेनचे आरक्षण विशेष शुल्कासह बुकिंग संगणकीकृत आरक्षण केंद्रे व आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सुरू होईल.