ETV Bharat / city

Non-BJP CM to Meet : बिगरभाजप मुख्यमंत्र्यांची लवकरच मुंबईत बैठक; राऊतांची माहिती

ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार नाही अशा राज्यांमधील अकरा मुख्यमंत्री आणि भाजपा विरोधातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. (Non-BJP CM to meet in Mumbai) या संदर्भात लवकरच एक बैठक मुंबईत आयोजित केली जाईल, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

्
d
author img

By

Published : Apr 18, 2022, 1:36 PM IST

मुंबई - देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार असले तरी या सरकारने महागाई विकोपाला नेली आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. तसेच, प्रादेशिक पक्षांना चिरडण्याचा या सरकारचा डाव आहे. तसेच, देशात धार्मिक हल्ले आणि दंगली होत असून पंतप्रधान त्याबाबत काहीही बोलत नाहीत, यासंदर्भात त्यांना विरोधकांनी पत्रही दिले आहे. ( NCP Chief Sharad Pawar ) या सर्व पार्श्वभूमीवर ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार नाही अशा राज्यांमधील अकरा मुख्यमंत्री आणि भाजपा विरोधातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात लवकरच एक बैठक मुंबईत आयोजित केली जाईल, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मार्गदर्शन करतील असही राऊत यांनी सांगितले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वीकारणार यजमानपद - विरोधकांची मोट बांधणे आणि केंद्रातील भाजपप्रणीत सरकारला शह देणे हा मुख्य उद्देश आहे. हे सरकार धार्मिक तेढ निर्माण करून मूळ मुद्द्यांवरून जनतेचं लक्ष आठवण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच प्रादेशिक पक्षांना चिरडून टाकण्याचा या सरकारचा डाव आहे म्हणून या सरकार विरोधात उद्धव ठाकरे नेहमीच आक्रमक राहिले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या आवाहनानुसार विरोधकांची ही बैठक लवकरच मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे.

ईडी चौकशीच्या मुद्यावरून शिवसेना अधिक आक्रमक - या बैठकीला उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतील आणि त्यासाठी ते पुढाकार घेतील. याबाबत तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनीही काही दिवसांपूर्वी ठाकरे यांची भेट घेतली आहे. कारण हिंदुत्वाच्या मुद्दयावरून आता भाजप आणि शिवसेना आमने सामने आली असली तरी ईडी चौकशीच्या मुद्यावरून शिवसेना अधिक आक्रमक झाली असल्याचे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केले आहे.

शरद पवारच घेतील पुढाकार - या बैठकीचे आयोजन राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे जबाबदारी स्वीकारून करतील. मात्र, विरोधकांची मोट बांधणे आणि सर्वांना एकत्र बांधून ठेवणे यासाठी दीर्घ अनुभव आणि संपर्क यांची गरज आहे. राष्ट्रीय स्तरावरील मान्यताही त्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणूनच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेच या बैठकीचे नेतृत्व करतील आणि ते पुढाकार घेतील अशी परिस्थिती आहे. शरद पवार यांनीही या संदर्भात नुकतीच माहिती देत बोलणी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Ashish Mishra Bail Canceled : लखीमपूर खेरी प्रकरणात आशिष मिश्रा यांचा जामीन रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.