ETV Bharat / city

Andheri East By Election : मुरजी पटेलांनी भरला उमेदवारी अर्ज; 35 हजार मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास

author img

By

Published : Oct 14, 2022, 6:04 PM IST

अंधेरी पूर्व, विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ( Assembly by-elections ) आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल ( BJP candidate Murji Patel ) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ( Nomination form filled by Murji Patel ) आहे. यानंतर प्रतिक्रिया देताना मी 35000 हजार मताधिक्याने निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Andheri East Assembly Election
मुरजी पटेल यांनी भरला उमेदवारी अर्ज

मुंबई - अतिशय चुरशीच्या होणाऱ्या अंधेरी पूर्व, विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ( Assembly by-elections ) आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल ( BJP candidate Murji Patel ) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ( Nomination form filled by Murji Patel ) आहे. यानंतर प्रतिक्रिया देताना मी 35000 हजार मताधिक्याने निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

बावनकुळे, शेलार यांची उपस्थिती - शिवसेनेचे अंधेरी पूर्व येथील दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजपने मुरजी पटेल ( BJP candidate Murji Patel ) यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ( BJP State President Chandrasekhar Bawankule ) भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, भाजप नेते प्रवीण दरेकर, कृपाशंकर सिंह हे उपस्थित होते.

शक्तीप्रदर्शन नसून स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा - अर्ज भरण्यापूर्वी मुरजी पटेल यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शिवसेना नेते, मंत्री दीपक केसरकर ( Minister Deepak Kesarkar ) हे सुद्धा सामील झाले होते. तसेच याप्रसंगी आशिष शेलार म्हणाले की, आज आमच्या उमेदवाराचे शक्तीप्रदर्शन दिसून आलेलं आहे. पण ते शक्तीप्रदर्शन नसून स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा त्यांनी आम्हाला दर्शवल्याचं हे चित्र तुम्ही पाहिलं आहे. विशेष म्हणजे आमच्या रॅलीला जी लोकं होती ते सर्व आमचे मतदार, आमचे कार्यकर्ते होते. परंतु ऋतुजा लटके ( Rituja Latke ) यांच्या समर्थनार्थ झालेल्या रॅलीमध्ये भाईंदर, दहिसर या भागातून कार्यकर्ते आणले होते असा आरोप त्यांनी केला आहे.

35 हजार मताधिक्याने मी निवडून येईन?- अर्ज भरल्यानंतर प्रतिक्रिया देताना भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी सांगितले आहे की, आज जे लोक माझ्या पाठीशी आहेत, ते सर्व विभागातील मतदार व स्थानिक कार्यकर्ते व त्यांची ताकद आहे. मागच्या निवडणुकीत सुद्धा मला चांगली मते भेटली होती. या भागात माझे कार्य आहे. आता या निवडणुकीत माझ्याबरोबर भाजपच नाही तर खरी शिंदे गटाची शिवसेना सुद्धा आहे. तसेच आरपीआयचा पाठिंबा ही मला असल्याकारणाने या निवडणुकीत मी 35 हजार मताधिक्याने मी निवडून येईन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.