मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक असलेल्या औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने नोडल अधिकारी नेमले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही नेमणूक केल्याची माहिती राज्य शासनाने दिली.
कोरोना काळात एम्फोटेरीसीन आणि टॉसिलीझूमाब इंजेक्शन या औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. औषधांचे वितरण योग्य प्रकारे व्हावे, यांचे नियंत्रण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने पुढीलप्रमाणे नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्हास्तरावर सदरील औषधांचे वितरण जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनाखाली करण्यात येते. त्यानुसार संबंधीत जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे निर्देश अन्न व औषध विभागाने दिले आहेत
हे असतील अधिकारी
- दा.रा.गहाणे, सह आयुक्त (मुख्यालय), महाराष्ट्र राज्य, मो.क्र.9892832289
- गौ.वा. ब्याळे, सह आयुक्त (औषधे) (बृहन्मुंबई), बृहन्मुंबई, मो.क्र.9892836216
- वि.तु.पौनिकर, सह आयुक्त (औषधे) (कोकण विभाग), कोकण विभाग, मो.क्र.9850272495
- दुष्यंत भामरे, सह आयुक्त (औषधे) (नाशिक) नाशिक विभाग, मो.क्र.9820245816
- एस.एस.काळे, सह आयुक्त (औषधे) (औरंगाबाद), औरंगाबाद विभाग, मो.क्र.9987236658
- एस.बी.पाटील, सह आयुक्त (औषधे) (पुणे), पुणे विभाग, मो.क्र.9326035767
- अशोक बर्डे, सह आयुक्त (औषधे) (अमरावती), अमरावती विभाग, 9833445208
- महेश गाडेकर, सह आयुक्त (औषधे) (नागपूर), नागपूर विभाग, 7709190076 असे अधिकारी आहेत.
मुंबईसाठी संपर्क
मुंबईत टॉसिलीझूमाब इंजेक्शनचे वितरण अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून करण्यात येते. तर एम्फोटेरीसीन इंजेक्शनचे वितरण के.ई.एम. रुग्णालय, मुंबई यांच्या निदर्शनाखाली करण्यात येते. याबाबत के.ई.एम. रुग्णालयाचा तपशील डॉ. प्रविण बांगर, मो.क्र.7977214118 यांच्याकडे द्यावा, अशा सूचना दिल्या आहेत.