ETV Bharat / city

Maharashtra Dam Water : दिलासादायक, राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; जाणून घ्या धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती - maharashtra dam water level latest news

राज्यात सध्या कडाक्याच्या उन्हाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची भीती सर्वांना होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पडलेल्या पाऊसामुळे यंदा पाणीटंचाई भासणार नाही ( No Water Shortage This Summer ) आहे.

jayakwadi dam
jayakwadi dam
author img

By

Published : Mar 31, 2022, 8:30 PM IST

मुंबई - एप्रिल महिन्याला सुरुवात होणार आहे. कडाक्याच्या उन्हाला सुरुवात झाली आहे. उन्हाळा सुरु झाला की, अनेकदा पाणीटंचाईचा प्रश्न समोर येतो. राज्यातील काही भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर आहे. उन्हाळा सुरु होताच ग्रामीण भागातील महिलांची डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती सुरु होते. मात्र, यंदा हे चित्र काहीसे बदलले आहे.

मागील दोन वर्षापासून राज्यात चांगला पाऊस पडला आहे. परिणामी यंदा राज्यातील सर्वच विभागात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईची चिंता ( No Water Shortage This Summer ) नाही. उन्हाळा सुरु झाला आहे, तरीही राज्यातील काही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा ( Maharashtra Dam Water ) आहे.

उजनी धरणात 65 टक्के पाणीसाठा - राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या उजनी धरणात आजच्या परिस्थतीला 65 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजे म्हणजे 70 टीएमसी पाण्याची साठवणूक क्षमता असलेल्या उजनी धरणात आजच्या परिस्थितीत 35.19 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

जायकवाडी धरणातील पाणीसाठा - आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे 103 टीएससीचे जायकवाडी धरण आहे. यंदा जायकवाडी धरणात जवळपास 65.70% टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेऔरंगाबादसह जालना, बीड जिल्ह्याचा काही आणी, गोदावरी नदी काठची आणि धरण पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये पाणी टंचाई भासणार नाही. एकदा धरण शंभर टक्के भरले की दोन वर्षे पाणी पुरेल, असे म्हणले जाते. म्हणून यावर्षी मराठवाड्यातील नागरिकांना पाणी टंचाई पासून मुक्ती राहील, असे तज्ञाचे मत आहे.

खडकवासला प्रकल्पात किती पाणीसाठा शिल्लक - खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरणात 15.45 टक्के म्हणजेच 0.57 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. वरसगाव धरणात 54 टक्के म्हणजेच 6.96 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पानशेत धरणात 59.17 म्हणजेच 6.30 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला धरणात 38.22 टक्के म्हणजेच 0.75 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला प्रकल्पात 50.05 टक्के इतका पाणीसाठा म्हणजेच 14.59 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी 55.81 टक्के म्हणजेच 16.27 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.

पुणे जिल्ह्यातील धरणांची सध्याची स्थिती - पिंपळगाव जोगे धरणात 22.05 टक्के म्हणजेच 0.86 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. माणिकडोह धरणात 20.67 टक्के म्हणजेच 2.10 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. येडगांव धरणात 93.59 टक्के म्हणजेच 1.82 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. वडज धरणात 51.68 टक्के म्हणजेच 0.60 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. डिंभे धरणात 38.56 टक्के म्हणजेच 4.82 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. घोड धरणात 50.02 टक्के म्हणजेच 2.44 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. विसापूर धरणात 33.31 टक्के म्हणजेच 0.30 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. चिल्हेवाडी धरणात 60 टक्के म्हणजेच 0.49 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. चासकमान धरणात धरणात 50.89 टक्के म्हणजेच 3.85 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. भामा आसखेड धरणात 71.38 टक्के म्हणजेच 5.47 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पवना धरणात 46.91 टक्के म्हणजेच 3.99 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मुळशी धरणात 26.54 म्हणजेच 5.35 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

कोल्हापूरातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा - उन्हाळा आला की अनेक जिल्ह्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याला यावर्षी सुद्धा घाबरण्याचे काम नाही. जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरपर्यंच पुरसा पाणीसाठा शिल्लक आहे. राधानगरी धरणात 57 टक्के पाणीसाठा, काळम्मावाडी धरणात 55 ते 57 टक्के पाणीसाठा, वारणा धरणात 55 टक्के पाणीसाठा, दुधगंगा धरणात 55 टक्के पाणीसाठा, कोयना धरणात 57 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

बारवी धरणात पाणीसाठा - बारवी धरणाची पाणीसाठवण्याची क्षमता ३३८. ८४ दशलक्ष मीटर एवढी आहे. आजच्या घडीला १८५.२० दशलक्ष मीटर पाणी साठा शिल्लक आहे. म्हणजे आजही धरणात ५४.६६ टक्के पाणी साठा असून, गेल्या आठवड्यात १८९.९४ दशलक्ष मीटर पाणी साठा धरणात होता. विशेष म्हणजे गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे यंदा मार्च महिन्याच्या अखेरीसही धरणात पुरेसा साठा उपलब्ध आहे.

हेही वाचा - Covid Restrictions Revoked Maharashtra : मोठी बातमी.. राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.