मुंबई यंदा 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत त्यापार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त आता महाराष्ट्राचे नवनियुक्त सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंधेला मोठी घोषणा केली आहे यापुढे सरकारी कार्यालयामध्ये अथवा सरकारी कर्मचाऱ्यांना फोनद्वारे संवाद साधताना हॅलो नाहीतर वंदे मातरमने संभाषणाला सुरुवात करावी लागणार govt employees to start teleconversation with Vande Mataram आहे. लवकरच त्याबाबत आदेश काढण्यात येणार आहे अशी माहिती सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी केली आहे
-
Maharashtra government officials will have to say Vande Mataram instead of hello while receiving phone calls in offices: minister
— Press Trust of India (@PTI_News) August 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra government officials will have to say Vande Mataram instead of hello while receiving phone calls in offices: minister
— Press Trust of India (@PTI_News) August 14, 2022Maharashtra government officials will have to say Vande Mataram instead of hello while receiving phone calls in offices: minister
— Press Trust of India (@PTI_News) August 14, 2022
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की वंदे मातरम हे आपले राष्ट्रीय गीत आहे. हा केवळ एक शब्द नसून भारत मातेबद्दलच्या भारतीयांच्या भावनांचे प्रतीक आहे 1875 मध्ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या या गाण्याने त्या काळातील स्वातंत्र्यसैनिकांना ऊर्जा दिली. हे आई मी तुला नमन करतो ही भावना व्यक्त करून बंकीमचंद्रांनी अनेकांच्या हृदयात देशभक्तीची ठिणगी पेटवली असेही मुनगंटीवार यांनी सांगितलं
दरम्यान शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आलं राज्यपाल भगतसिहं कोश्यारींनी मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खातेवाटप केलं त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना वन सांस्कृतिक विभाग आणि मत्स व्यवसाय विभागाचे मंत्रिपद देण्यात आले आहे. खातेवाटप जाहीर झाल्यावर मुनगंटीवार यांनी सरकारी कार्यालयात वंदे मातरतबाबत मोठा निर्णय घेतला आहे
हेही वाचा Cabinet Expansion मंत्रिमंडळात फडणवीसचं वजनदार वाचा कोणाकडे कोणती खाती