मुंबई - भाजप आमदार रामाची जागा, विठोबाची जागा लाटत आहेत. यामध्ये भाजपने सुमारे देवस्थानांच्या ५१३ एकर जमीनी लाटल्या आहेत. हा हजारो कोटींचा घोटाळा आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मलिक म्हणाले, मागील काही दिवसांपूर्वी ईडीने वक्फ बोर्डाच्या ऑफिसवर छापा टाकला अशा बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. मात्र, अस काहीही झालेले नाही हे आम्ही त्यावेळी त्यावेळी स्पष्ट केले होते.
आत्तापर्यंत 11 एफआयआर दाखल
महाराष्ट्रामध्ये बोर्डाच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही 11 एफआयआर दाखल केल्या आहेत. यातील पहिली एफआयआर नांदेड, औरंगाबाद, बुराहण शाह वली परभणी, जालना, पुणे, बदलापूर, औरंगाबाद, आणि दोन्ह गुन्हे आष्टी बीड येथे दाखल केलेले आहेत. या सोबतच काही खाजगी लोकांनी मशिदीच्या बाबतीत गुन्हा दाखल केला आहे. ते टाकळी बीड येथील रहिवाशी आहेत.
10 ठिकाणी देवस्थानच्या जमिनीत केलेले भ्रष्टाचार समोर आणले आहेत
बीडमध्ये 3 ठिकाणी सर्व्हिस इनाम जमीन होती. ती मदत इनाम जाहीर करून त्यावर खाजगी नाव चढवण्यात आले आणि प्लॉटींग करण्यात आले. तसेच, त्याची विक्री केली जात आहे. यासोबतच राम खाडे यांनी 10 ठिकाणी देवस्थानच्या जमिनीत केलेले भ्रष्टाचार समोर आणले आहेत. यातील 7 हिंदू देवस्थान आहेत आणि 3 मुस्लिम देवस्थान आहेत. अशी माहिती नवाब मलिक यांनी यावेळी दिली आहे. तसेच, यामध्ये विठोबा देवस्थान 31 एकर 42 गुंटे, खंडोबा देवस्थान 35 एकर, राम देवस्थान 65 एकर, खंडोबा देवस्थान बेळगाव 65 एकर अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.
यामध्ये मच्छिंद्र मल्टीस्टेटचा देखील समावेश आहे
513 एकर जमीन अधिकाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी शेळके यांची मदत घेण्यात आली होती. त्यांना या प्रकरणी निलंबितही करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी एसआयटी नेमण्यात आली आहे. त्याबाबतचा तपास सुरु आहे असही मलिक म्हणाले आहेत. या प्रकरणी विविध ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये ईडीकडे देखील तक्रार देण्यात आली आहे. यामध्ये मच्छिंद्र मल्टीस्टेटचा देखील समावेश आहे. यामध्ये भाजपचे सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नावानेही ईडीकडे तक्रार करण्यात आली होती अशी माहितीही मलिकांनी दिली आहे.
देवस्थानची जागा हडप करणाऱ्यांविरोधात कारवाईस सुरुवात
भाजप आमदार रामाची जागा, विठोबाची जागा लाटत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. देवस्थानची जागा हडप करणाऱ्यांविरोधात आम्ही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सध्या ज्या तक्रारी उपलब्ध होत आहेत. त्यांची चौकशी करून तथ्य असल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती मलिकांनी दिली आहे.
हेही वाचा - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2021 : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानाला सुरुवात; वाचा कुठे काय परिस्थिती