ETV Bharat / city

Sanjay Raut On BMC : कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले तरी मुंबई मनपा आम्ही जिंकू -राऊत - Mumbai Municipal Corporation

राज्यात सध्या मनसेची बदललेली भूमिका व भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेली राज ठाकरे यांची भेट यामुळे पुन्हा एकदा भाजप मनसे युतीच्या चर्चांना जोरदार सुरुवात झाली आहे. यासंदर्भात आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजप आणि मनसेवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत
author img

By

Published : Apr 4, 2022, 12:41 PM IST

Updated : Apr 4, 2022, 1:20 PM IST

मुंबई - नितिन गडकरी यांनी राज ठाकरे भेट घेतली त्यावर संजय राऊत म्हणाले अशा भेटी गाठी होत असतात. प्रत्येक भेटी मागे राजकारण असते असे नाही. यावर बोलावे असं काही नाही. मनसे आणि भाजपची युती होणार का? यावरही फारसे बोलावे असे काही नाही. रात गई बात गई असही राऊत म्हणाले आहेत. मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, औरंगाबाद महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यासह सर्व महानगरपालिका शिवसेना ताकदीने लढेल आणि जिंकेल असही ते म्हणाले आहेत.

संजय राऊत पत्रकारांशी बोलताना

पालिकेवर आमचाच भगवा कायम - मुंबई महानगरपालिकेचा भगवा झेंडा कितीही असंतुष्ट आत्मे महाराष्ट्राविरूद्ध एकत्र आले, मराठी माणसाविरूद्ध कितीही कटकारस्थान केली तरी कारस्थानांच्या छाताडावर उभे राहून मुंबई महापालिका जिंकू, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही किती षड्यंत्र रचा आम्ही उभे राहू असही ते म्हणाले आहेत.

चंद्रकांत दादा काहीही करू शकतात - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, "कोल्हापूर उत्तरचीच कशाला गोव्यामध्ये पणजी मतदारसंघ, साखळी या मतदार संघामधील मतदारांची अगोदर ED चौकशी लावा. चंद्रकांत दादा पाटीलांनी फार चांगली सूचना केली आहे. चंद्रकांत दादा याचं हे वक्तव्य फार इन्टरेस्टींग आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी जर यात पुढाकार घेतला तर मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून या लढाईत त्यांच्याबरोबर उभा राहीन.

शरद पवार युपीए अध्यक्ष - "शरद पवार यांच्या सक्रीय सहभागाशिवाय विरोधकांच्या एकजूटीचं पाऊल पुढं जाणार नाही. शरद पवार यांच्या मनात काय आहे हे आम्ही समजू शकतो. शरद पवार यांच्या प्रयत्नाशिवाय या देशामध्ये विरोधी पक्षांची एकजूट आणि मोदींना पर्याय निर्माण होऊ शकत नाही असही राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - MNS-BJP Alliance ? : सध्या युतीची चर्चा नाही! मात्र यांना का मिर्चा झोंबतात; मनसे नेत्याचे ट्विट

Last Updated : Apr 4, 2022, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.