ETV Bharat / city

Hopital Board In Marathi : मराठी पाटी नसल्याने काँग्रेसने रुग्णालयाच्या बोर्डला फासले काळे

author img

By

Published : Jan 24, 2022, 3:01 AM IST

Updated : Jan 24, 2022, 4:26 AM IST

राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक अर्थात पाट्या मराठी भाषेत असाव्यात, असा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला ( Maharashtra Government Shops Marathi Board ) आहे. मात्र, तरीही मराठी पाटी न लावल्याने उत्तर मुंबईतील एका रुग्णालयाच्या बोर्डवर युवक काँग्रेसने काळे ( Congress Black Ink Board Hospital In Mumbai )फासले आहे.

Marathi Board In Marathi
Marathi Board In Marathi

मुंबई - राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक अर्थात पाट्या मराठी भाषेत असाव्यात, असा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने ( Maharashtra Government Shops Marathi Board ) घेतला आहे. मात्र, तरीही मराठी पाटी न लावल्याने उत्तर मुंबईतील एका रुग्णालयाच्या बोर्डवर युवक काँग्रेसने काळे फासले ( Congress Black Ink Board Hospital In Mumbai ) आहे.

मराठी पाट्यांबाबत महाराष्ट्र सरकारने नियमावली जाहीर केली ( Maharashtra Government Shops Marathi Board ) आहे. याबाबत बोरीवली येथील अपेक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला आपले नाव तसेच, आकारण्यात येणारे सेवा शुल्क प्रदर्शित करून नावाचा फलक मराठीमध्ये बदलण्याचा युवक काँग्रेसने अल्टिमेटम दिला होता. तरीही त्याची अंमलबजावणी न करण्यात आल्याने शेवटी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाची नेम प्लेट काळी करण्यात आली आहे.

मराठी पाट्यांबाबतचा निर्णय काय?

कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना, तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. मात्र, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

हेही वाचा - Latur Youth Murder : लातूरात तरुणाची निर्घूण हत्या, कारण अस्पष्ट

Last Updated : Jan 24, 2022, 4:26 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.