ETV Bharat / city

Mumbai Railway: मुंबईतही रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकीट दरात वाढ होणार का? रेल्वेचे अधिकारी म्हणाले 'असं' - मुंबई रेल्वे

दिल्ली येथे छठ पूजेच्या (chhath puja 2022) निमित्ताने होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी दिल्ली रेल्वे महामंडळाने काही काळ तिथल्या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवले आहेत. (delhi railway platform ticket). दिल्लीमध्ये जसे रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटाचे दर वाढवले तसेच मुंबईतही (mumbai railway platform ticket) ते वाढवले जातील का? या ईटीव्ही भारतच्या प्रश्नावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले आहे.

Mumbai Railway
Mumbai Railway
author img

By

Published : Oct 6, 2022, 2:55 PM IST

मुंबई: दिल्ली येथे छठ पूजेच्या (chhath puja 2022) निमित्ताने होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी दिल्ली रेल्वे महामंडळाने काही काळ तिथल्या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवले आहेत. (delhi railway platform ticket). मुंबईत देखील छट पूजेच्या निमित्ताने रेल्वे मार्गावर बऱ्याचदा गर्दी पाहायला मिळते.

मुंबईत दर नाही वाढवणार: दिल्लीमध्ये जसे रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटाचे दर वाढवले तसेच मुंबई पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दरही वाढवले जाणार का? या ईटीव्ही भारतच्या प्रश्नावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग तसेच पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर या दोघांनीही मुंबईत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवण्याचा कोणताही निर्णय नसल्याचा खुलासा केला आहे.

उत्तर प्रदेश, बिहार आणि एकूणच उत्तर भारतामध्ये हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गर्दी होऊ नये याकरिता दिल्लीत ३१ ऑक्टोबर 202 पर्यन्त प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढवले जाणार असल्याने मुंबईतील नागरिकांना चिंता होती, मात्र मुंबईतील तिकीट दरात कुठलाही बदल होणार नाही, अशी माहिती ब्रिजेश शर्मा यांनी ईटीव्हीला दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.