ETV Bharat / city

Kishori Pednekar On Tipu Sultan : महापालिकेकडे टिपू सुलतानच्या नावाने अधिकृत उद्यान नाही - पेडणेकर - Kishori Pednekar On Tipu Sultan

मालाडमध्ये महापालिकेकडे टिपू सुलतानच्या नावावर अधिकृतपणे कोणतेही उद्यान नाही, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली आहे.

Kishori Pednekar
Kishori Pednekar
author img

By

Published : Jan 31, 2022, 1:49 PM IST

Updated : Jan 31, 2022, 2:13 PM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपात टिपू सुलतानच्या नावावरुन वादंग निर्माण झाले आहे. त्यात आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्या उद्यानाच्या नावावरुन स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईतील मालाडमध्ये महापालिकेकडे टिपू सुलतानच्या नावावर अधिकृतपणे कोणतेही उद्यान नाही, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मालाडमध्ये टिपू सुलतानच्या नावावर मुंबई महापालिकेकडे कोणतेही अधिकृत उद्यान नाही. टिपू सुलतान उद्यान नामक फलक तेथील स्थानिक आमदाराने लावला आहे. त्यांच्याशी आम्ही याबाबत बोलत आहोत, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.

  • There is no garden officially named after Tipu Sultan by BMC in Malad, Mumbai. The name of the garden is not registered with BMC. The signboard (of the garden's name) has been installed by the local MLA, with whom, we are speaking: Mumbai Mayor & Shiv Sena leader Kishori Pednekar pic.twitter.com/kG27H8562m

    — ANI (@ANI) January 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजपा, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन -

मुंबई मालाड येथील मालवणीच्या टिपू सुलतान मैदानाबाबत आता राजकारण चांगलेच तापले असून, टिपू सुलतान मैदानाचे उद्घाटन पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते झाले. मात्र त्याआधी भाजप बजरंग दल विश्व हिंदू परिषदेने सातत्याने आंदोलन केले. आणि आरएसएसचे लोक सातत्याने मागणी करत आहेत की टिपू सुलतानच्या नावाने मैदान आहे. या मैदानाचे नामांतर करू नये, त्याला विरोध करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांनी आधीच चांगली तयारी होती, मात्र असे असतानाही बजरंग दल, भाजप, विश्व हिंदू परिषदेच्या हजारो कार्यकर्त्यांनी मैदानापूर्वीच सुमारे 500 मीटर अंतरावर बॅरिकेड्स लावले होते. जिथे आंदोलक रस्त्यावर बसून आंदोलन करताना दिसत होते. उद्घाटन स्थळापूर्वीच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

भाजपने मुंबईत सर्वप्रथम टिपू सुलतानचे नाव घेतले

पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले होते की, भाजपने मुंबईत सर्वप्रथम टिपू सुलतानचे नाव घेतले होते. मालवणीच्या या मैदानाबद्दल बोलायचे झाले तर हे मैदान १५ वर्षे जुने आहे. त्यांनी या ठिकाणी फित कापून उद्घाटन कार्यक्रम पार पाडला आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.

'तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपतींचा राजीनामा घ्यावा

टिपू सुलतानचं नाव दिलं म्हणून अस्लम शेख यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजप करत असेल तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेतला पाहिजे. राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचा गौरव केला होता. त्यामुळे सर्वात आधी भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा. मुंबईत काय करायचं हे मुंबई महापालिका आणि राज्य सरकार पाहून घेईल. तुम्ही काळजी करू नका, असा सणसणीत हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

Last Updated : Jan 31, 2022, 2:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.