ETV Bharat / city

'पाकिस्तानी नागरिकाचे क्रेडिट कार्ड सापडले नाही,' प्रताप सरनाईक म्हणाले..

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी खुलासा करताना त्यांना कुठल्याही प्रकारचे ईडी समन्स आलेले नसल्याचे म्हटले आहे. शिवाय, त्यांच्या घरातून ईडीला कुठल्याही प्रकारचे क्रेडीट कार्ड मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक लेटेस्ट न्यूज

author img

By

Published : Dec 12, 2020, 6:59 PM IST

मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांसंबंधी स्वतः आमदार प्रताप सरनाईक यांनी खुलासा करताना त्यांना कुठल्याही प्रकारचे ईडी समन्स आलेले नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या घरातून ईडीला कुठल्याही प्रकारचे क्रेडीट कार्ड मिळाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आमदार प्रताप सरनाईक यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला.

पाकिस्तानी नागरिकाचे क्रेडिट कार्ड सापडले नाही - प्रताप सरनाईक

मला बदनाम करण्याचे षडयंत्र

आमदार सरनाईक गेल्या गुरुवारी ईडी कार्यालयमध्ये चौकशीसाठी हजर झाले असता, त्यांची पाच तासाहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 'माझ्या उत्तरांनी अधिकाऱ्यांचे समाधान झाले आहे की नाही, हे मला माहीत नाही,' असे सरनाईक यांनी म्हटले होते. तसेच, गरज वाटेल तेव्हा ईडीच्या सांगण्यानुसार मी चौकशीसाठी पुन्हा हजर होईन, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - 'शरद पवार दोन वेळा पंतप्रधान होताना राहिले, पण तो दिवस पुन्हा येईल'

ईडीच्या सूत्रांचा दावा

ईडीच्या सूत्रांनी दावा केला आहे की, प्रताप सरनाईक यांना 21 डिसेंबर रोजी पुन्हा कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. मात्र, प्रताप सरनाईक यांनी अद्याप कुठल्याही प्रकारचे समन्स मिळाले नसल्याचे म्हटले आहे. या बरोबरच माध्यमांमध्ये पाकिस्तानी नागरिकाच्या क्रेडिट कार्डबद्दल आलेल्या बातम्यांचेही त्यांनी खंडन केले आहे. 'मी नेहमीच पाकिस्तानच्या विरोधात बोलत आलेलो आहे. असे असताना माझ्या घरी पाकिस्तानच्या नागरिकाच्या नावावर असलेले क्रेडिट कार्ड कसे काय मिळू शकते? हे मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे,' असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

हेही वाचा - पवार साहेबांचे वय मोजू नये, सगळे तरुण त्यांच्या पुढे फिके पडतील - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.