ETV Bharat / city

Bjp Vs Shivsena : स्थायी समिती अध्यक्षांवरील अविश्वास ठराव 'या' कारणामुळे बारगळणार - मुंबई महापालिका निवडणूका

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली ( Mumbai Corporation Election 2022 ) आहे. त्यातच आता भाजपाने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( Bmc Standing Committee Chairman Yashwant Jadhav ) यांच्याविरोधात अविश्वास ठराव ( Bjp No confidence Motion Against Shivsena ) मांडला आहे. परंतू, हा ठराव बारगळण्याची चर्चा सुरु आहे.

no confidence motion against Yashwant Jadhav

author img

By

Published : Jan 16, 2022, 9:30 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ ( Mumbai Corporation Election 2022 ) आली आहे. तसे, भाजपा आणि शिवसेनेतील कलगीतुरा वाढला आहे. पालिकेतील सत्ता घालवण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहे. त्याच्याच एक भाग म्हणून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( Bmc Standing Committee Chairman Yashwant Jadhav ) यांच्याविरोधात भाजपाकडून अविश्वास ठराव मांडण्यात आला ( Bjp No confidence Motion Against Shivsena )आहे. मात्र, अविश्वास ठराव बारगळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने भाजपाकडून शिवसेनेला लक्ष केले जात ( Bjp Target Shivsena Bmc ) आहे. कोरोना काळातील गैरव्यवहार, खर्चातील अनियमतता, सभागृहात बोलू दिले जात नसल्याच्या कारणावरुन भाजपाने शिवसेनेला धारेवर धरले. त्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने भाजपाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता भाजपाकडून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात अविश्वास ठराव ( Bmc Standing Committee Yashwant Jadhav ) मांडण्यात आला आहे.

चर्चेत राहण्यासाठी हा ठराव

भाजपावाले स्वतःला बुद्धिमान समजतात. मात्र त्यांना हा अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी सर्व सभागृहाची मंजुरी आवश्यक आहे हे त्यांना माहीत नाही का, अशी टिका महपौर किशोरी पेडणेकर यांनी केली. तसेच, चर्चेत राहण्यासाठी हा ठराव आणत आहे. नुसते आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी कोणी चूक करत असल्यास ते दाखवावे आम्ही नक्की कारवाई करू, असेही पेडणेकर म्हणाल्या. याबाबात विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले की, वरिष्ठांशी चर्चा करुन या ठरावावर काय भूमिका घ्यायची ते ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले.

म्हणून ठराव बारगळणार

मुंबई महापालिकेत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तरतूद आहे. आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात दोन तृतीयांश बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करता येतो. तर लोकप्रतिनिधींच्या विरोधात बहुमताने अविश्वास मंजूर होऊ शकतो. अविश्वास ठराव मंजूर झाल्यावर संबंधित लोकप्रतिनिधींचा राजीनामा घेण्याची तरतूद नाही. तो लोकप्रतिनिधी स्वत:हून राजीनामा देऊ शकतो. महापौर तीन दिवस आधी नोटीस देऊन अविश्वास ठराव चर्चेला आणू शकतात. परंतु, सध्याची आकडेवारी पाहता हा अविश्वास ठराव बारगळण्याची शक्यता असल्याची माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

पालिकेतील पक्षांचे बलाबल

एकूण 227 नगरसेवक

शिवसेना - 96 नगरसेवक

भाजपा - 82 नगरसेवक

काँग्रेस - 29 नगरसेवक

राष्ट्रवादी काँग्रेस - 9 नगरसेवक

समाजवादी पक्ष - 7 नगरसेवक

हेही वाचा - Shivaji Maharaj Statue Issue Amravati : काही लोक समाजातील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करताय - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.