मुंबई - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चर ( Maharashtra Chamber of Commerce Industry and Agriculture ) यांच्यातर्फे आयोजित नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ व "अर्थसंकल्पानंतरची महाराष्ट्र विकासाची दिशा" यावर मुंबईत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एकंदरीत राज्यात तसेच देशात विकासासाठी काय महत्त्वाचे आहे यावर महत्वाचे भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी इथेनॉल नसता आणला तर अर्धे साखर कारखाने बंद झाले असते असे ( Nitin Gadkari on Ethanol ) देखील सांगितले.
ग्रामीण भागात आजही समस्या!
याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की, पूर्वी 85 टक्के लोक गावात राहत असत तर 15 टक्के लोक शहरात राहत असत. परंतु, आता गावातील टक्केवारी कमी झाली असून शहरातील टक्केवारी वाढली आहे. याचे कारण गावांमध्ये आजही त्या सर्व समस्या आहेत. रोजगार, वीज, पाणी या समस्या आजही गावांमध्ये आहेत. जोपर्यंत महाराष्ट्राचा समतोल विकास होत नाही व त्या दृष्टीने सर्वांचा विचार केला जात नाही. तोपर्यंत महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने मागेच राहील. ग्रामीण भागांमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असायला हवा. जर आज इथेनॉल आले असतं तर अर्धे साखर कारखाने बंद झाले असते असेही गडकरी म्हणाले. 450 कोटी इथेनॉल दहा टक्के पेट्रोलमध्ये काम करते. देशात 900 कोटी इथेनॉलची गरज असल्याचे सांगत आता बायो इथेनॉलचा सुद्धा विचार करावा लागणार आहे, असे गडकरी म्हणाले.
जिम्मेदारी घ्यायला शिका पुढे जाल!
आज राज्यात तांदूळ, मका, गहू, साखर मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्या कारणाने इतक्या दिवसात तांदूळ व मक्यापासून सुद्धा इथेनॉल बनवायची परवानगी घेण्यात येणार आहे. कोळसा ऐवजी आता बांबू वापरणे फायद्याचे ठरणार आहे. अमेरिका, युरोप येथील लॉजिस्टिक कॉस्ट 12 टक्के आहे तर भारतात ती 14 टक्के आहे. दोन लाख कोटी रुपयांचे लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर त्यासाठी सरकारने जागा दिली तर उत्तम होईल असेही ते म्हणाले.
तर इतरांना का दोष देता? -
वॉटर टॅक्सीला प्रामुख्याने प्राधान्य दिल्याने नवी मुंबई एअरपोर्टसाठी 75 टक्के लोक पाण्याने प्रवास करतील, असे सांगत दक्षिण मुंबईतून किमान 13 मिनिटांमध्ये नवी मुंबई एअरपोर्टला पोहचता येणार आहे. आता डिझेल ट्रक एलएनजीमध्ये कन्व्हर्ट करायला दहा लाख रुपये लागतात. परंतु हे दहा लाख रुपये 290 दिवसांमध्ये पूर्णपणे वसूल होतात असेही ते म्हणाले. इलेक्ट्रिक बस, कारचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवला पाहिजे. दिल्ली मुंबई हायवे एका वर्षात तयार केला जाईल. याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी उपस्थितांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये अर्थसंकल्पाचे विशेष करून इथेनॉलचे महत्त्व सांगितले. लग्न तुमचं झाले, पोरं तुम्हाला झाली नाही तर इतरांना का दोष देता? असे गडकरी यांनी सांगितल्यावर सभागृहामध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. गडकरी यांना हे सुचवायचे होते की तुमची जिम्मेदारी तुम्ही घ्या. काम भरपूर आहेत प्रकल्प भरपूर आहेत. पण ते नेटाने आणि जोमाने पुढे नेण्यासाठी कोणतरी मुख्य हवा असतो. म्हणून ती जिम्मेदारी आपणच घ्यायला हवी असेही ते म्हणाले.
गरिबाला मोठे करायचं आहे -
गडकरी पुढे म्हणाले की, मला आता श्रीमंताला श्रीमंत नाही करायचा आहे. गरीब शेतमजूर सामान्य माणूस यांच्या पैशाने मला आता ब्रिज बांधायचे आहेत. यांना आता मोठे करायचे आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये गुंतवणुकीची कमी नाही आहे. त्याचबरोबर ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील महत्त्वाचे इंधन असल्याचेही गडकर यांनी याप्रसंगी सांगितले.
हेही वाचा - Lata Mangeshkar health : लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली, पुन्हा व्हेंटिलेटरवर