ETV Bharat / city

AC Double Decker Bus नितीन गडकरी यांच्या हस्ते पहिल्या एसी डबल डेकर बसचे लोकार्पण - नितीन गडकरी बसचे लोकार्पण

इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे Double Decker Bus आज लोकार्पण झाले. हा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांच्या उपस्थित पार पडला. नितीन गडकरी यांनी कायमच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. इलेक्ट्रिक बस हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. लंडनच्या धर्तीवर आज बेस्टने BEST सर्व सुविधांनी सज्ज अशी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत रुजू केली आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीनं टाकेलले हे महत्त्वाचे पाऊल आहे. या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे मुंबईकरांनी कौतुक केले आहे.

नितीन गडकरी यांच्या हस्ते पहिल्या एसी डबल डेकर बसचे लोकार्पण

author img

By

Published : Aug 18, 2022, 4:45 PM IST

मुंबई - इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे Double Decker Bus आज लोकार्पण झाले. हा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांच्या उपस्थित पार पडला. नितीन गडकरी यांनी कायमच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. इलेक्ट्रिक बस हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. लंडनच्या धर्तीवर आज बेस्टने BEST सर्व सुविधांनी सज्ज अशी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत रुजू केली आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीनं टाकेलले हे महत्त्वाचे पाऊल आहे. या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे मुंबईकरांनी कौतुक केले आहे. ही बस पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बेस्टने एका खासगी कंपनीला टप्प्याटप्प्याने 900 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्याचे कंत्राट दिले असून त्यापैकी 50 टक्के बसेस मार्च 2023 पर्यंत वितरित केल्या जाणार आहेत. पहिली डबल-डेकर इलेक्ट्रिक बसचे आज लोकार्पण पार पडले. पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस लॉंचिंगनंतर काही चाचण्यांमधून जाण्याची शक्यता आहे.

कॉफी टेबल बुकचे प्रकाशन देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी आज बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सामील झाली आहे. बेस्टच्या डबल डेकर बसेस ही मुंबईची शान असून त्या जुन्या झाल्याने त्यांची देखभाल करणे अवघड झाले आहे. त्यामुळे बेस्टच्या डिजिटलीकरणात आता नव्या इलेक्ट्रीक एसी डबल डेकर दाखल होणार आहेत. विविध सेवांचे लोकार्पण बेस्टच्या महापालिकाकरणास 75 वर्षे तसेच स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नरिमन पॉईंट येथील टाटा थिएटर येथे साय. 6.30 वा. बेस्टची प्रिमियम सेवा, दुमजली वातानुकूलित बस, बेस्टची स्वयंचलित मार्गप्रकाश व्यवस्थापन प्रणालींचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते होईल. बेस्ट उपक्रमाची अमृत महोत्सवी कथा पुस्तकाचे प्रकाशन, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन यावेळी होईल.

असा आहे बेस्टचा ताफा अंडरटेकिंगच्या ताफ्यात 1990 पासून 900 पारंपारिक डबल-डेकर बस आहेत, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची संख्या सातत्याने कमी होत असून आता त्यांची संख्या 50 इतकीच उरली आहे. पाच बसेस खुल्या डेक हेरिटेज टूरसाठी वापरल्या जातात. ज्याला हो-हो बस म्हणतात, तर उर्वरित शहराच्या विविध मार्गांवर चालतात. सध्या, बेस्टच्या 3,500 बसेसच्या ताफ्यासह दररोज सुमारे 32 लाख प्रवासी प्रवास करतात.

हेही वाचा - हरिहरेश्वर येथे संशयित बोटी; तटकरेंची विधान परिषदेत चौकशीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.