मुंबई - नितेश राणे यांच्या जामिनावर 17 जानेवारी निकाल येणार आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी दोन्ही बाजूचे युक्तीवाद पूर्ण झाले आहेत. 17 जानेवारीला राणेंच्या जामीन अर्जावर निकाल लागणार आहे. तोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा नितेश राणे यांना कायम असणार आहे.
हेही वाचा-Santosh Parab Attack : मुंबई उच्च न्यायालकडून नितेश राणे यांना दिलासा कायम; गुरुवारी पुन्हा सुनावणी
राणेंना अटक होणार?
सत्र न्यायालयाने तीन दिवसांच्या दिर्घ सुनावणीनंतर नितेश राणे यांचा जामीन फेटाळला आहे. त्यानंतर नितेश राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचले आहे. राणेंच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या चार दिवसात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंना आता उच्च न्यायालयात तर दिलासा मिळणार का? की राणेंना अटक होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
हेही वाचा-आमदार नितेश राणेंना तात्पुरता दिलासा, सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक टळली
दोन्ही बाजुच्या वकिलांनी केला युक्तीवाद
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचारामध्ये संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर राणे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावरील दोन्ही बाजूचे युक्तीवाद गुरूवारी पूर्ण झाले. बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी राणे यांच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला होता. निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी हा खोटा आरोप करण्यात आला, असा युक्तिवाद ॲड. नितीन प्रधान यांनी राणे यांच्या वतीने केला होता. या प्रकरणानंतर राणे यांना धडा शिकविणार असल्याचे सेना नेते म्हटल्याचे राणेंच्या वकिलांनी सांगितले होते.
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर अखेर नितेश राणे यांनी ( Sindhudurg session court rejected Rane bail ) 3 जानेवारी जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात शुक्रवारी 7 जानेवारीला नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. या सुनावणीत नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून ( Nitesh Rane not relieved by Mumbai High Court ) कोणताही दिलासा मिळाला नाही.