ETV Bharat / city

आमदार नितेश राणे यांचा शिवसेनेला इशारा, संस्कृतीचे धडे देऊ नका! नाहीतर पुन्हा, म्याऊ.., - सुनील प्रभू नितेश राणे आंदलन टीका

एकीकडे मुख्यमंत्री आजारी असल्याने ते हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवनात उपस्थित राहत ( CM absent in winter session ) नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. दुसरीकडे त्यांचे पुत्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली विरोधी पक्षनेत्यांनी उडविल्याने शिवसैनिक ( Shivena Party workers anger agianst Rane ) संतापले आहेत.

आमदार नितेश राणे
आमदार नितेश राणे
author img

By

Published : Dec 25, 2021, 3:29 AM IST

मुंबई - आम्हाला संस्कृतीचे धडे शिकवू नका? नाहीतर पुन्हा मी म्याऊ.. म्याऊ केले जाईल, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून दिला आहे. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी विधाधनसभेत राणेंच्या वर्तवणुकीवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपतर्फे सरकार विरोधात विधान मंडळाच्या पायर्‍यांवर बसून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या प्रवेश यादरम्यान त्यांना म्याऊ, म्याऊ बोलून त्यांची खिल्ली उडविण्यात आली होती. या संदर्भामध्ये शिवसेना आमदार सुनील प्रभू ( Sunil Prabhu on Nitesh Ranes behavior ) यांनी हा मुद्दा शुक्रवारी विधानसभेत उपस्थित केला. विधान सभेतच नाही तर भवनाच्या परिसरामध्ये कोणी असभ्य वर्तन केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी अध्यक्षांना मागणी केली. हा धागा पकडून भाजप आमदार नितेश राणे यांनी, आम्हाला संस्कृतीचे धडे शिकवू नका? नाहीतर पुन्हा मी म्याऊ.. म्याऊ केले जाईल, असा इशारा ट्विटरवरून ( Nitesh Rane warns Shivsena ) दिला आहे.

हेही वाचा-Horoscope 2022 Leo : सिंह राशीच्या लोकांसाठी 2022 हे वर्ष कसं असेल, जाणून घ्या

काय आहे ट्विटमध्ये ?

यांनी नक्कल केली तर ती ठाकरी भाषा.. आम्ही केली तर संस्कृती चे धडे देणार..
गेले ते दिवस..
नियम सगळ्यांना एकच .. लक्षात असुन द्या !!!
नाहीतर..परत meow meow आहेच !

आमदार नितेश राणे यांचे ट्विट
आमदार नितेश राणे यांचे ट्विट

हेही वाचा-१८२ ST Workers Dismissed : मोठी कारवाई.. एकाच दिवसात एसटीचे १८२ कर्मचारी केले बडतर्फ

शिवसैनिकांमध्ये नाराजी

एकीकडे मुख्यमंत्री आजारी असल्याने ते हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवनात उपस्थित राहत ( CM absent in winter session ) नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. दुसरीकडे त्यांचे पुत्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली विरोधी पक्षनेत्यांनी उडविल्याने शिवसैनिक ( Shivena Party workers anger agianst Rane ) संतापले आहेत.

हेही वाचा-Omicron Threat Mumbai : दुबईतून येणारे प्रवासी आता ७ दिवस होम क्वारंटाईन.. सार्वजनिक वाहतूक वापरण्यास बंदी

दोन्ही राणे बंधूंकडून ठाकरे कुटुंबावर टीका

आमदार नितेश राणे यांनी अशा पद्धतीने ट्विट करून पुन्हा एकदा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नितेश यांचे मोठे बंधू माझी खासदार निलेश राणे यांनीही ट्विट करत मुख्यमंत्री यांच्या आजारपणावरून निशाणा साधला ( Nilesh Rane tweet against Maharashtra CM ) आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असतानासुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत काम करत होते. परंतु मुख्यमंत्री शिंकले तरी ते आजारी पडतात, अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. एकंदरीत ठाकरे कुटुंबावर आता राणे कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणामध्ये ट्विटरच्या माध्यमातून टीका होताना दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.