ETV Bharat / city

अँटेलिया स्फोटक प्रकरण; दहशतवादी तहसीनच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा, अनेक पोलीस अधिकारी एनआयएच्या रडारवर

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या भरलेली एक गाडी सापडली होती. ही गाडी सापडल्यानंतर टेलीग्रामवर एक मॅसेज देखील आला होता. हा मॅसेज दिल्लीच्या तिहार कारागृहातून आला होता. याबाबत तपास केला असता, हा फोन इंडीयन मुजाहीद्दीनच्या तहसीन अख्तरचा असल्याचे उघड झाले होते.

NIA Seize Terrorist Tehseen Akhtar Phone
तिहार कारागृह
author img

By

Published : Aug 4, 2021, 1:06 PM IST

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ठेवण्यात आलेल्या स्फोटक प्रकरणात तिहार कारागृहातील दहशतवादी तहसीनच्या फोनवरुन मॅसेज पाठवण्यात आला होता. याप्रकरणी मॅसेज पाठवण्यात आलेला दहशतवादी तहसीनचा फोन एनआयएने ताब्यात घेतला आहे. या फोनमधून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. तहसीनच्या फोनमधील माहितीवरुन अनेक पोलीस अधिकारी एनआयएच्या रडारवर आहेत.

मुंबईत 25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या भरलेली एक गाडी सापडली होती. ही गाडी सापडल्यानंतर एक टेलीग्रामवर मॅसेज देखील आला होता. हा मॅसेज दिल्लीच्या तिहार कारागृहातून आला होता. ज्या मोबाईल नंबरवरून हा मॅसेज पाठवण्यात आला होता, तो मोबाईल एनआयएने आपल्या ताब्यात घेतला आहे. आता एनआयए या मोबाईल नंबरचा तपास करत आहे.

या मोबाईलमधून अनेक पुरावे मिळण्याची दाट शक्यता एनआयएला आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे देखील समोर येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने तिहार कारागृहातून मोबाईल जप्त केले आहेत. हे मोबाईल इंडियन मुजाहिद्दीनच्या तहसीन अख्तरचे आहेत. तहसीनकडून दोन मोबाईल दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जप्त केले. हे दोन्ही मोबाईल एनआयएनने आपल्या ताब्यात घेतले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.