ETV Bharat / city

Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एनआयएने न्यायालयाकडे आरोपपत्र दाखल करण्यासाठी मागितला वेळ - उमेश कोल्हे यांची हत्या

उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एनआयएने एनआयए विशेष न्यायालयाकडे (Umesh Kolhe Murder Case) आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे.

Umesh Kolhe Murder Case
Umesh Kolhe Murder Case
author img

By

Published : Sep 19, 2022, 3:16 PM IST

Updated : Sep 19, 2022, 5:43 PM IST

मुंबई - उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एनआयएने एनआयए विशेष न्यायालयाकडे आरोपपत्र दाखल करण्यासाठी Umesh Kolhe Murder Case आणखी वेळ मागितला आहे. तपासाला वेळ लागत आहे. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी थोडा वेळ हवा आहे, असे एनआयने न्यायालयाने सांगितले आहे.

उमेश कोल्हे यांची हत्या - भाजपचे माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू मोहम्मद पैगंबर विरोधात वक्तव्य केले होते. याला समर्थन करणारी पोस्ट करणारे अमरावतीतील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एनआयए 10 आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याकरिता मुदत संपत असल्याने पुन्हा मुदत वाढवून देण्यात यावी याकरिता एनआयएकडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.

एनआयए तपासाला 180 दिवस पूर्ण - उमेश कोल्हे हत्याकांडामध्ये एनआयए तपासाला 180 दिवस पूर्ण होत आहेत त्यांना आरोप पत्र दाखल करण्या अवश्यक होते. मात्र एनआयएने आज सत्र न्यायालयात अर्ज केला. तसेच या प्रकरणात आणखी 180 दिवस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी या अर्जाद्वारे केली आहे. एनआयएने असा युक्तिवाद केला की या प्रकरणांमध्ये आरोपींकडून कुठल्याही प्रकारचे तपासात सहकार्य मिळत नाही. तसेच आरोपींची लिंक ही आंतरराष्ट्रीय टेररिझम सोबत असल्याचे देखील पुरावे मिळाले आहेत. एनआयएने असा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी तपास करणे बाकी असल्याने मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दहा आरोपींना अटक - एनआयएने या प्रकरणात आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे. तर या प्रकरणातील एक मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्याला शोधणारे आणि त्या संदर्भातील माहिती देणाऱ्या व्यक्तीला 15 लाख रुपये बक्षीस देण्याची देखील एनआयएने घोषणा केली आहे. मात्र अद्यापही आरोपीची कुठलीही माहिती मिळाली नाही.

अटक करण्यात आलेले आरोपी - एनआयएकडून आतापर्यंत अटक करण्यात आलेले आरोपीमध्ये इरफान खान (32), मुदस्सर अहमद उर्फ ​​सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण उर्फ ​​बादशाशा हिदायत खान (25), अब्दुल तौफिक उर्फ ​​नानू शेख तस्लीम (24), शोएब खान उर्फ ​​भुर्या साबीर खान (22), अतीब रशीद आदिल रशीद (22), युसूफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण - नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावसायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केले. त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.

Last Updated : Sep 19, 2022, 5:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.