- विशेष एनआयए कोर्टाने 28 जूनपर्यंत एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा समवेंत अन्य 2 आरोपींना एनआयए कोठडी सुनावली आहे.
Live Updates: एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी - NIA search operation
16:51 June 17
15:45 June 17
या प्रकरणी आतापर्यंत 10 आरोपींना अटक
मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टेलिया घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांसंदर्भात एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासह आणखी दोन आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आली आहे. मनिष सोनी व सतीश त्रीभूतकर असे या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
15:29 June 17
- मुंबई - मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी एनआयएने प्रदीप शर्मा यांना अटक केली होती. त्यांनी मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आले.
14:19 June 17
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला एनआयएकडून अटक
मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात आतापर्यंत 7 जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केल्यानंतर यामध्ये आठवी अटक करण्यात आलेली आहे. मुंबई पोलीस खात्यातील विवादात राहिलेले माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. या अगोदर काही दिवसांपूर्वी प्रदीप शर्मा यांची तब्बल 7 तास चौकशी केली होती. मात्र यानंतर आनंद जाधव आणि संतोष शेलार या दोन आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून हिरेन मनसुख यांची हत्या केल्यानंतर त्यातील सबळ पुरावे नष्ट करण्याच्या प्रकरणांमध्ये प्रदीप शर्मा यांचा मोठा हात असल्याचं समोर आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी प्रदीप शर्मा यास अटक केली आहे.
11:52 June 17
तब्बल ५ तासांच्या झडतीनंतर प्रदीप शर्मांच्या घरातून एनआयएची टीम रवाना
मुंबई - तब्बल ५ तासांच्या झडतीनंतर प्रदीप शर्मांच्या घरातून एनआयएची टीम रवाना झाली आहे. तपासादरम्यान एनआयएने एक काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
09:10 June 17
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर छापा, 'एनआयए'ने घेतले ताब्यात
मुंबई - मनसूख हिरेन हत्या प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयएकडून रात्री उशिरा प्रदीप शर्मा यांच्या घराची झडती घेण्यात आली. तसेच शर्मा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी दोन वेळा शर्मा यांची एनआयने चौकशी केली होती.