ETV Bharat / city

सचिन वाझेंना अँटिलियाजवळ नेत एनआयएने केले गुन्ह्याचे नाट्य रुपांतर - एनआयए नाट्यरुपांतर

याप्रकरणी एनआयएला जो सीसीटीव्ही व्हिडिओ मिळाला होता, त्यामध्ये गाडीत स्फोटके ठेवणारी व्यक्ती पीपीई किटमध्ये दिसून येत आहे. या किटमध्ये वाझेच असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे, या घटनेचे नाट्य रुपांतर करण्यात आले. यावेळी एनआयएचे वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट्सही याठिकाणी हजर होते..

NIA recreated the crime scene near Antilia with Sachin Vaze
सचिन वाझेंना अँटिलियाजवळ नेत एनआयएने केले गुन्ह्याचे नाट्य रुपांतर
author img

By

Published : Mar 20, 2021, 3:33 AM IST

Updated : Mar 20, 2021, 5:55 PM IST

मुंबई : मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाहेर स्फोटके असणारी कार आढळून आली होती. याप्रकरणी एनआयए तपास करत आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीच ही गाडी याठिकाणी ठेवली असा एनआयएला संशय आहे. त्यामुळे, वाझेंना घटनास्थळी नेत एनआयएने शुक्रवारी रात्री उशीरा या संपूर्ण प्रकरणाचे नाट्य रुपांतर केले.

नाट्यरुपांतराचे दृश्य.

पीपीई किटमधील व्यक्ती वाझेच असल्याच्या खात्रीसाठी प्रयोग..

शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास एनआयएचे पथक वाझेंना घटनास्थळी घेऊन गेले. त्याठिकाणी गाडीमध्ये स्फोटके ठेवण्याच्या घटनेचे नाट्य रुपांतर त्यांच्याकडून करुन घेण्यात आले. याप्रकरणी एनआयएला जो सीसीटीव्ही व्हिडिओ मिळाला होता, त्यामध्ये गाडीत स्फोटके ठेवणारी व्यक्ती पीपीई किटमध्ये दिसून येत आहे. या किटमध्ये वाझेच असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे, या घटनेचे नाट्य रुपांतर करण्यात आले. यावेळी एनआयएचे वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट्सही याठिकाणी हजर होते.

हिरेन प्रकरणीही वाझे अडचणीत..

मनसुख हिरेनच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे. याप्रकरणी सचिन वाझेंविरोधात भक्कम पुरावे हाती लागल्याचा दावा एटीएसने केला आहे. त्यामुळे, सचिन वाझेंचा ताबा मागण्यासाठी एटीएसने न्यायालयात धाव घेतली होती. एटीएसचे अधिकारी शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. या हत्येमध्ये वाझे यांचा हात असल्याचा संशय एटीएसला आहे.

सध्या सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात आहेत. सीसीटीव्ही फुटेज, मनसुख यांच्या पत्नीचे आरोप, पाच महागड्या गाड्या या सर्व गोष्टींमुळे वाझे पूर्णपणे अडचणीत सापडले आहेत.

हेही वाचा : सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ.. हिरेन मृत्यू प्रकरण एनआयएकडे !

Last Updated : Mar 20, 2021, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.