मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके आढळण्याच्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्यानंतर एनआयएने यासंदर्भात तत्काळ कारवाई सुरू केल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी एनआयएने तपासाला सुरूवात केल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई-ठाण्यात तपास सुरू
मुंबई-ठाण्यात एनआयएच्या पथकाने काही ठिकाणी जाऊन चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबरोबरच या प्रकरणातील मुख्य साक्षीदारांपैकी एक असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळलेल्या रेती बंदर या ठिकाणीही जाऊन एनआयएच्या पथकाने तपास सुरू केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग व पुण्याचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन या संदर्भातील कागदपत्रांची मागणी करत तपासाला सुरुवात केल्याचीही माहिती आहे.
एटीएसकडूनही तपास सुरू
एटीएसच्या पथकाकडूनही या संदर्भातील तपास सुरू आहे. मृत हिरेन मनसुख यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा या प्रकरणी दाखल करण्यात आलेला आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच खात्यातील अधिकारी सचिन वझे यांच्या निलंबनाची मागणी करत त्यांना तात्काळ कलम 201 च्या अंतर्गत अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र राज्य सरकारकडून यासंदर्भात एटीएसकडून तपास केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अँटिलियाबाहेर स्फोटके प्रकरणी एनआयएचा तपास सुरू! - nia
मुंबई-ठाण्यात एनआयएच्या पथकाने काही ठिकाणी जाऊन चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबरोबरच या प्रकरणातील मुख्य साक्षीदारांपैकी एक असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळलेल्या रेती बंदर या ठिकाणीही जाऊन एनआयएच्या पथकाने तपास सुरू केल्याची माहिती मिळत आहे.