मुंबई - अँटिलिया कार स्फोटकं प्रकरणात प्रदीप शर्मा यांची एनआयएने तब्बल ९ तास चौकशी केली आहे. सलग दुसऱया दिवशी ही चौकशी करण्यात आली आहे. बुधवारीही प्रदीप शर्मा यांची ८ तास चौकशी करण्यात आली होती.
हेही वाचा - 'लसीचा केवळ दीड दिवस पुरेल एवढाच साठा, ५-६ दिवसांत ऑक्सिजनची कमतरता भासेल'
बुधवारी झाली होती आठ तास चौकशी
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून एकेकाळी मुंबईत पोलीस खात्यात नावाजलेल्या प्रदीप शर्मा या माजी पोलीस अधिकाऱ्याचीसुद्धा आज(9 एप्रिल) चौकशी करण्यात आली आहे. एनआयएने शर्मा यांची नऊ तास चौकशी केली.
हेही वाचा - 'रेमडेसिवीर' तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांकडून उत्पादकांची बैठक