मुंबई - अँटिलिया बाहेर स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी मुंबई पोलीस दलातील एनआयने गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वझे यांना अटक केली. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित आणखी अधिकारी पोलीस निरीक्षक रियाझ काझी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत काझी यांची एनआयए कडून चौकशी करण्यात आली. तब्बल साडे नऊ तास एनआयएने काझी यांची चौकशी केली. काझी यांच्यासोबत आणखी एक अधिकाऱ्याचीही यावेी चौकशी करण्यात आली आहे.
इनोव्हा सीआययू विभागाचीच
अँटिलिया बाहेर स्कॉर्पिओ सोडण्यात आल्यानंतर आरोपींनी जी इनोव्हा कार वापरण्यात आली होती, ती कार सीआययू या विभागाची होती. सचिन वझे यांचे निकटवर्तीय आणि पोलीस अधिकारी रियाझ काझी हे गेले अनेक वर्ष मुंबई पोलीस दलात काम करत आहेत. सध्या रियाझ काझी हे सीआययू विभागात कार्यरत आहेत.
इनोव्हा चालकांचा नोंदवला जवाब-
रियाझ काझी यांना एनआयने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत एका अधिकाऱ्याचीही चौकशी करण्यात आली. तसच या प्रकरणात आणखी काही अधिकाऱ्यांच्या चौकशीची शक्यता आहे. यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे. तसेच इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालकांचाही जवाब नोंदवला असून एका व्यावसायिकाला याप्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.