मुंबई - पुढील काही दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात तापमान 40 अंशाच्यावर जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेऊनच बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
'या' कारणामुळे वाढणार तापमान
सध्या कच्छ, सौराष्ट्र परिसरात मोठ्या प्रमाणात तापमान वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे उत्तर कोकणात देखील जमिनीलगत वाहणाऱ्या उष्ण कोरड्या वाऱ्यामुळे मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.
'घाबरू नका काळजी घ्या'
घाबरू नका काळजी घ्या. ही तापमान वाढ फक्त पुढचे दोन दिवस असण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही उष्णतेची लाट हळूहळू कमी होईल. कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5°C वर व कमाल तापमान किमान 37°C असावे. त्यामुळे आता मुंबईकरांनो घराबाहेर पडताना योग्य काळजी घेऊनच व सोबत मुबलक प्रमाणात पाणी घेऊनच घराबाहेर पडा, असे आवाहन होसाळीकर यांनी केले आहे.
हेही वाचा - Heatwave In Maharashtra : मुंबईसह राज्यातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा