ETV Bharat / city

नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग टेस्ट : मुंबईत ‘डेल्टा व्हेरियंट’ चे ११ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ८९ टक्के तर ओमायक्रॉनचे २ रुग्ण - next generation genome sequencing test

मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) विषाणूमध्ये होणारे बदल समोर यावेत म्हणून नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचण्या (Genome Sequencing Test) केल्या जातात. पालिकेने नुकत्याच पाचव्यांदा या चाचण्या केल्या असून त्यामधून मुंबईमधील ८९ टक्के रुग्णांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे, ११ टक्के ‘डेल्टा व्हेरिअंट’चे तर २ रुग्ण ओमायक्रॉनचे आढळून आले आहेत.

corona
कोरोना फाईल फोटो
author img

By

Published : Dec 9, 2021, 8:54 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) विषाणूमध्ये होणारे बदल समोर यावेत म्हणून नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचण्या (Genome Sequencing Test) केल्या जातात. पालिकेने नुकत्याच पाचव्यांदा या चाचण्या केल्या असून त्यामधून मुंबईमधील ८९ टक्के रुग्णांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे, ११ टक्के ‘डेल्टा व्हेरिअंट’चे तर २ रुग्ण ओमायक्रॉनचे आढळून आले आहेत. पाचव्यांदा चाचण्या करण्यासाठी संकलित केलेल्या नमुन्यांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

  • ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ८९ टक्के रुग्ण -

मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या काळात मुंबईमध्ये कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. मात्र त्यानंतरही कोरोना विषाणूचा प्रसार वाढू नये यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. तसेच मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट आला का याचीही तपासणी वेळोवेळी केली जात आहे. त्याच अनुषंगाने पालिकेने नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचण्या सुरु केल्या आहेत. आतापर्यंत पालिकेने चार वेळा अशा चाचण्या केल्या आहेत. आता पाचव्यांदा या चाचण्या करण्यात आल्या आहेत. पाचव्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचण्यांमध्ये मुंबईतील २२१ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे ११ टक्के तर ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ८९ टक्के रुग्ण आढळले आहेत. तसेच, ओमायक्रॉन या नवीन प्रकाराचे फक्त २ रुग्ण आढळले आहेत. पालिकेने जे नमुने संकलित केले त्या २२१ पैकी एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. चाचणीचे सर्वंकष निष्कर्ष पाहता, कोविड लसीकरण वेगाने केल्याचा प्रभाव म्हणून मुंबई महानगरातील कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट होत आहे. असे असले तरी, नवीन ओमायक्रॉन विषाणू प्रकाराचा वेगाने प्रसार होण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला इशारा लक्षात घेता, सर्वांनी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन यापुढेही कठोरपणे करणे आवश्यक आहे. सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणे देखील आवश्यक आहे असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार, कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण चाचणी उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतो आहे. विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार अद्यापही समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे महानगरपालिका आरोग्य प्रशासनाला शक्य झाले आहे.

  • काय आहे अहवालात -

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या पाचव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण २७७ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २२१ रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या २२१ नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष देण्यात येत आहेत. मुंबईतील २२१ रुग्णांपैकी १९ रुग्ण (९ टक्के) हे ० ते २० वर्षे आतील वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात ६९ रुग्ण (३१ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटात ७३ रूग्ण (३३ टक्के), ६१ ते ८० वयोगटात ५४ रुग्ण (२५ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील ६ रुग्ण (३ टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत. चाचणीतील निष्कर्षानुसार, २२१ पैकी २४ रुग्ण (११ टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर १९५ रुग्ण (८९ टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उर्वरित दोघे जण ओमायक्रॉन या नवीन प्रकारच्या विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण संकलित नमुन्यांच्या संख्येच्या तुलनेत त्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. २२१ पैकी पहिला डोस घेतलेल्या फक्त एका रुग्णाला तर दोन्ही डोस घेतलेल्या अवघ्या २६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लसीचा एकही डोस न घेतलेल्या ४७ पैकी १२ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. एकूण २२१ रुग्णांपैकी, वय वर्ष १८ पेक्षा कमी असलेल्या वयोगटामध्ये १३ जण मोडतात. पैकी २ जणांना ‘डेल्टा व्हेरिअंट’ आणि ११ जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे.

  • जिनोम सिक्वेसिंग लॅब -

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिनांक ४ ऑगस्ट २०२१ रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर सदर यंत्रणा वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित (validation) होवून कार्यान्वित करण्यात आली आहे. या वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये जनुकीय सूत्र निर्धारण करु शकणारे दोन संयंत्र उपलब्ध आहेत. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. - बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे हे २ जीनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहे. जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱया वैद्यकीय यंत्रणेच्या माध्यमातून सर्वप्रथम दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी चाचणी करण्यात आली. त्यानंतर दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी दुसऱयांदा, दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी तिसऱयांदा तर दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ रोजी चौथ्यांदा कोविड नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.