ETV Bharat / city

आज...आत्ता...( रविवार १६ जून २०१९ ) सायंकाळी ७ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या.. - roha

पावसामुळे खेळ थांबवला, भारताची धावसंख्या तीनशेपार. विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवारांनी धरला वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह. धनगर समाजासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. अमरीश आत्रामांना आदिवासी, वन राज्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. रोहा तालुक्यातील तिघे कुंडलिका नदीत बुडाले, शोध सुरू

आज...आत्ता...( रविवार १६ जून २०१९ ) सायंकाळी ७ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या..
author img

By

Published : Jun 16, 2019, 7:14 PM IST

WC IND VS PAK Live : पावसामुळे खेळ थांबवला, भारताची धावसंख्या तीनशेपार

मॅनचेस्टर - भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या महामुकाबल्यास सुरुवात झाली असून, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारताकडून जायबंदी शिखर धवनच्या जागी विजय शंकरला स्थान देण्यात आले आहे.

वाचा सविस्तर - WC IND VS PAK Live : पावसामुळे खेळ थांबवला, भारताची धावसंख्या तीनशेपार

विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवारांनी धरला वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह

मुंबई - विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धरला आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे वडेट्टीवार नेमणूक करावी अशी मागणी करणार असल्याचे पवार म्हणाले. पवार यांच्या या भूमिकेमुळे उद्या विधानसभेत वडेट्टीवार यांच्या नावावर विरोधीपक्ष नेते म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर -विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवारांनी धरला वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह

धनगर समाजासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार - मुख्यमंत्री

मुंबई - राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मार्ग काढला आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीतही कामे सुरू असून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आश्वासन दिले. विरोधकांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारवर टीका केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

वाचा सविस्तर - धनगर समाजासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार - मुख्यमंत्री

अमरीश आत्रामांना मुख्यमंत्र्यांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'बाबत निष्क्रियता भोवली; आदिवासी, वन राज्यमंत्रीपदावरुन पायउतार

गडचिरोली - रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 नवीन चेहर्‍यांना संधी देत सहा मंत्र्यांना डच्चू दिला. यामध्ये राज्याचे आदिवासी, वन राज्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अमरीश आत्राम यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सूरजागड लोह प्रकल्पाबाबत निष्क्रियता व जनसंपर्काचा अभाव यामुळेच त्यांना राज्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.

वाचा सविस्तर -अमरीश आत्रामांना मुख्यमंत्र्यांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'बाबत निष्क्रियता भोवली; आदिवासी, वन राज्यमंत्रीपदावरुन पायउतार

रोहा तालुक्यातील तिघे कुंडलिका नदीत बुडाले, शोध सुरू
रायगड - रोहा तालुक्यातील चिंचोली येथे कुंडलिका नदीत तीन जण बुडाल्याची घटना घडली आहे. महेश अरुण जेजुरकर (वय 39) परेश अरुण जेजुरकर (वय 35) आणि अक्षय शालिग्राम गणगे (वय 29) अशी या बुडालेल्यांची नावे आहेत.

वाचा सविस्तर -रोहा तालुक्यातील तिघे कुंडलिका नदीत बुडाले, शोध सुरू

Intro:Body:

ENT 04

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.