राज्यातील संपूर्ण महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात...
पहिले खावटी कर्ज द्यावे मगच आदिवासी विकास मंत्र्यांनी गाड्या घ्याव्यात
- यवतमाळ - कोरोनामुळे राज्य आर्थिक अडचणी आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना खावटी कर्ज मिळून राहिले नाही. तर आदिवासी विकास मंत्री वाहन खरेदी करीत आहे. राज्यातील आदिवासी बांधवांचा मंत्र्यांनी विचार करावा अन्यथा आदीवासी समाज आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे आदिवासी नेते प्रमोद घोडाम यांनी सांगितले.
मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या युवकांना न्याय द्या, सरकार सोबत बैठकीसाठी आंदोलक मुंबईत
- औरंगाबाद - औरंगाबाद येथून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वय आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांच्या नातेवाईकांसह मुंबईकडे प्रस्थान केले आहे. सरकारने आता पर्यंत आंदोलन काळात आत्महत्या केलेल्या युवकांच्या कुटुंबियांना मदत दिली नाही. त्याबाबत राज्य सरकार सोबत बोलावण्यात आली असून त्यासाठी सर्वजण मुंबईला गेले आहेत.
खासदार भारती पवार यांची कोविड सेंटरला भेट; सुविधांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना दिल्या सुचना
- मनमाड - दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी आज (बुधवार) अचानक मनमाड शहरातील सेंट झेवीयर्स हायस्कूल येथील कोविड सेंटरला भेट देऊन सुविधांचा आढावा घेत पाहणी केली. यावेळी त्यांनी डॉक्टर व तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली.काही तक्रारी असल्यास तात्काळ मला कळवा असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
जळगाव जिल्ह्यात बुधवारी 342 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 12 जणांचा मृत्यू
- जळगाव - जिल्ह्यातील कोरोना विषाणू वेगाने हातपाय पसरत आहे. जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये 342 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. दुसरीकडे, बुधवारी दिवसभरात 12 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10 हजार 591 इतकी झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले ५८ कोरोना रुग्ण; तिघांचा मृत्यू
- पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासांत ५८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या ५८ कोरोना रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच ४० रुग्ण पालघर तालुक्यातील असून ११ डहाणू तालुक्यातील, १ वाडा तालुक्यातील, ३ मोखाडा तालुक्यातील व ३ वसई ग्रामीण भागातील रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासात ग्रामीण भागात तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील तीनही मृत रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमंग फाऊंडेशन, टेंभोडे तर्फे पालघर ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आली पोर्टेबल एक्स- रे मशीन
- पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमंग फाऊंडेशन, टेंभोडे तर्फे पालघर ग्रामीण रुग्णालयासाठी पोर्टेबल एक्स- रे मशीन देण्यात आली. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांच्या उपस्थितीत संस्थेच्या अध्यक्षा संध्या पाटील यांच्या हस्ते या मशीनचे प्रातिनिधिक छायाचित्र देत मशीन पालघर ग्रामीण रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आली.