ETV Bharat / city

..तर म्यूकरमायकोसिस होणारच नाही! टास्क फोर्सने रुग्ण, डॉक्टरांना दिल्ला सल्ला

author img

By

Published : May 20, 2021, 3:43 PM IST

आरोग्य यंत्रणासमोर म्यूकरमायकोसिस आजाराला रोखण्याचे आव्हान असून हे आव्हान कसे पेलायचे याचे उत्तर अखेर राज्य म्यूकरमायकोसिस टास्क फोर्सने दिले आहे. कोरोनावरील उपचार घेत असल्यापासून पुढील 100 दिवस रुग्णाची साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम डॉक्टरांकडून झाले तर त्या रुग्णाला म्यूकरमायकोसिस होणारच नाही, असा दावा डॉ. आशेष भूमकर, सदस्य, राज्य म्यूकरमायकोसिस टास्क फोर्स यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे.

..तर म्यूकरमायकोसिस होणारच नाही!
..तर म्यूकरमायकोसिस होणारच नाही!

मुंबई - राज्यात कोरोनाच्या बरोबरीने जीवघेण्या अशा म्यूकरमायकोसिस आजाराने कहर माजवला आहे. या आजाराने राज्यात अंदाजे 90 रुग्णांचा बळी घेतला आहे. तर रोजच्या रोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. अशावेळी आरोग्य यंत्रणासमोर या आजाराला रोखण्याचे आव्हान असून हे आव्हान कसे पेलायचे याचे उत्तर अखेर राज्य म्यूकरमायकोसिस टास्क फोर्सने दिले आहे. कोरोनावरील उपचार घेत असल्यापासून पुढील 100 दिवस रुग्णाची साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम डॉक्टरांकडून झाले तर त्या रुग्णाला म्यूकरमायकोसिस होणारच नाही, असा दावा डॉ. आशेष भूमकर, सदस्य, राज्य म्यूकरमायकोसिस टास्क फोर्स यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे.

'लवकरच आपण या आजाराला हद्दपार करू'

रुग्णांची साखर 140 ते 180 दरम्यान ठेवली तर त्याला हा आजार होत नाही. पण कोरोना काळात साखर नियंत्रित ठेवण्याला प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळेच रुग्णांची साखर प्रचंड वाढून म्यूकरमायकोसिसची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर आता कोविडचे रुग्ण हाताळणाऱ्या सर्व डॉक्टरांना रुग्णांची साखर रोज तपासत पुढील 100 दिवस ती नियंत्रणात ठेवावी, अशा गाईडलाइन राज्य सरकारच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणाना दिल्या आहेत. तेव्हा या गाईडलाइनचे तंतोतंत पालन झाले तर लवकरच आपण या आजाराला हद्दपार करू असा विश्वास डॉ. भूमकर यांनी व्यक्त केला आहे.

अशी होते 'म्यूकॉर' बुरशीची बाधा
म्यूकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून तो 'म्यूकॉर' नावाच्या बुरशीपासून होतो. ही बुरशी वर्षोनुवर्षे आपल्या हवेत, मातीत आहे. तर रोजच्या रोज श्वासाद्वारे प्रत्येकाच्या शरीरात जाते. अगदी जन्मापासून मरेपर्यंत आपल्या शरीरात म्यूकॉरचे कण जातात. पण शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तातील साखरेचे योग्य प्रमाण राहत असल्याने याचा आजार होत नाही किंवा याची बाधा होत नाही. फक्त ज्या रुग्णांची साखर वाढते, साखर खूप वाढून शरीरात फ्री आयर्न तयार होते अर्थात एक प्रकारे शरीरात साखरेचा पाक तयार होतो आणि मग त्या रुग्णाला म्यूकॉर बुरशीची बाधा होते. त्यातून म्यूकरमायकोसिस आजार होतो. हा आजार खूपच दुर्मीळ असून या आजाराची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्याही अत्यंत नगण्य आहे. ज्या रुग्णांची साखर नियंत्रणात राहत नाही आणि ती खूपच वाढते तेव्हाच या आजाराची लागण होते. त्यातही वृद्ध आणि किडनी-मधुमेहाचा त्रास असलेल्या, खूपच आजारी असलेल्या वृद्ध व्यक्तीना मोठ्या संख्येने याची लागण होते. त्यानुसार कोरोना आधी एका कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे वर्षाला 4 ते 5 रुग्ण उपचारासाठी येत होते. तिथे आज एक डॉक्टर दिवसाला 10 रुग्ण तपासत असून ही चिंतेची बाब असल्याचे डॉ. भूमकर सांगतात.

'वेळेत निदान झाले तर बरे अन्यथा...'
म्यूकरमायकोसिस आजार जुना आणि खूपच दुर्मीळ आहे. त्यातही या आजाराचा मृत्यूदर 60 ते 80 टक्के असा असून उपचार न मिळाल्यास मृत्यूदर 100 टक्के आहे. पण जर हा आजाराचे वेळेत निदान झाले आणि योग्य उपचार दिले गेले तर दोन आठवड्यात हा आजार बरा होतो. पण जर या आजाराचे निदान झाले नाही आणि तो बळावला तर रुग्णाला डोळा, टाळू गमवावा लागतो आणि त्यात मोठ्या संख्येने रुग्ण दगावतात. त्यामुळे मुळात रक्तातील साखर 180 च्या पुढे जाऊच देऊ नका, 140 ते 180 दरम्यान साखर नियंत्रित ठेवा. म्हणजे हा आजार तुमच्या जवळपासही फिरकणार नाही असेही डॉ. भूमकर सांगतात. दरम्यान मधुमेही रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यास आणि रक्तातील साखर वाढत गेल्यास या रुग्णाला म्यूकरमायकोसिस आजाराचा धोका वाढतो. त्याचवेळी कोरोना विषाणू इतका घातक आहे की ज्या रुग्णांना मधुमेह नाही त्यांच्या रक्तातील साखर वाढवून त्यांना मधुमेह आजार देत आहे. त्यामुळेच कोरोनाची लागण झाल्यानंतर मधुमेह आजार झालेल्या रुग्णांची संख्या मागील वर्षभरात वाढती आहे. तर आता मधुमेही रुग्णांचे साखरेचे प्रमाण प्रचंड वाढल्यास म्यूकरमायकोसिसची लागण होत आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आणि त्यातही मधुमेह असलेल्या, कोरोनात मधुमेह आजार जडलेल्या रुग्णांनी रोज साखर तपासावी. ती 180 दरम्यान नियंत्रणात ठेवावी. जर साखर वाढली तर औषधे आणि इन्सुलिन देत ती नियंत्रित करावी, असा सल्ला डॉ. भूमकर यांनी कोविडचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दिला आहे.

'या आजाराला लवकरच आपण रोखू'

मुळात आतापर्यंत कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसातील संसर्ग कमी करणे, रक्ताच्या गाठीवर उपचार देणे, उच्च दाब आणि ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात ठेवणे यावरच विशेष लक्ष दिले जाते. तर हे लक्ष देणे गरजेचे आहे. पण त्याचवेळी रुग्णाची रोज साखर तपासणे आणि ती नियंत्रणात ठेवणे याकडे उपचारात लक्ष दिले जात नाही. मुळात वैद्यकीय शास्त्रानुसार साखरेच्या नियंत्रणाकडे फारसे लक्ष दिले नाही तरी त्याचा घातक परिणाम होत नाही समज आहे. पण आता मात्र कोरोनाने वैद्यकीय शास्त्रातील हा समज दूर करण्यास भाग पाडले आहे. कारण आता जर कोरोना रुग्णांची साखर नियंत्रणात राहीली नाही तर त्यांना जीवघेण्या म्यूकरमायकोसिसची लागण होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना या म्युकॉरची बाधा होण्यापासून वाचवणे हे कोविडचे उपचार करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरच्या हातात आहे. रुग्ण दाखल झाल्यापासून 100 दिवस डॉक्टर आणि रुग्णांनी साखर नियंत्रित करण्यास प्राधान्य दिले तर पुढील 3 महिन्यात या आजाराला आपण राज्यातून पूर्णतः हद्दपार करू. त्यामुळेच आता सर्व डॉक्टरांना यासंबंधीच्या गाईडलाइन देण्यात आल्या आहेत. आता या गाईडलाइनचे पालन होईल आणि या आजाराला लवकरच आपण रोखू असा विश्वास डॉ. भूमकर यांनी व्यक्त केला आहे.

या औषधोपचारांची गरज
म्युकॉरची बाधा झाल्याचे लक्षात आल्याबरोबर, त्याची लक्षणे दिसल्याबरोबर रुग्णांने त्वरित कान-नाक-घसा तज्ज्ञाकडे धाव घेणे गरजेचे आहे. तर या डॉक्टरांनी लवकर निदान करत औषधोपचार सुरू करणे ही गरजेचे आहे. रुग्ण वेळेत आला तर तो दोन आठवड्यात बरा होतो. तर संसर्ग वाढला असल्यास त्याच्यावर 2 ते 3 शस्त्रक्रिया कराव्या लागतात. तसेच रुग्णाला अँफीट्रोसीन बी आणि इसावूकोनाझोल ही दोन्ही इंजेक्शने दिली तर रुग्ण लवकर आणि ठणठणीत बरा होत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. मात्र त्याचवेळी या दोन्ही इंजेक्शनचा मोठा तुटवडा सध्या देशात आहे. या इंजेक्शनचे उत्पादन कमी होत असल्याने हा तुटवडा आहे. पण आता या इंजेक्शनची उपलब्धी वाढववण्यासाठी सरकार कामाला लागले आहे. लवकरच इंजेक्शनचा मोठा साठा राज्याला उपलब्ध होईल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - 'बार्ज पी३०५' वरील ३७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले; १८८ जणांना वाचवण्यात यश, बचावकार्य सुरुच..

हेही वाचा - मोदी तर दिलदार नेते, महाराष्ट्रालाही १५०० कोटी रुपये देतील - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.