ETV Bharat / city

‘ती परत आलीये’ मालिकेत हणम्या सापडतो मास्कधारी व्यक्तीच्या तावडीत! - समीर खांडेकर

'ती परत आलीये’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षक पाहू शकतील की मित्रांचे पालक त्यांना शोधत रिसॉर्टजवळच्या जंगलात येतात आणि मास्कधारी व्यक्तीच्या कचाट्यात सापडतात. मित्रांना कळतं की त्यांचे नातेवाईक त्यांना शोधत आले आहेत. पण त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी मात्र त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.

ती परत आलीये
ती परत आलीये
author img

By

Published : Nov 11, 2021, 11:03 AM IST

मुंबई - झी मराठीवरील (Zee marathi) नवीन मालिका 'ती परत आलीये’ (ti parat aali) एक गूढ रहस्यमय मालिका असून या मालिकेचं लेखन 'देवमाणूस' (Devmanus) या लोकप्रिय मालिकेचे लेखक स्वप्नील गांगुर्डे (Swapnil Gargunde) यांनी केलं आहे. आता ही मालिका अजूनही चांगलीच रंगत चालली आहे. ‘ती परत आलीये’ या मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरगोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

ती परत आलीये
ती परत आलीये

मालिकेतील एक लक्षवेधी भूमिका म्हणजे हणम्याची. अभिनेता समीर खांडेकर (sameer khandekar) ही व्यक्तिरेखा अगदी चोख बजावतोय. पण आता मालिकेत हणम्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षक पाहू शकतील की मित्रांचे पालक त्यांना शोधत रिसॉर्टजवळच्या जंगलात येतात आणि मास्कधारी व्यक्तीच्या कचाट्यात सापडतात. मित्रांना कळतं की त्यांचे नातेवाईक त्यांना शोधत आले आहेत. पण त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी मात्र त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.

मास्कधारी व्यक्ती मित्रांच्या नातेवाईकांना पकडून एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवते. मित्र आपल्या नातेवाईकांना शोधण्याचा खूप प्रयत्न करतात पण ते त्यांना सापडत नाहीत. हणम्याला टीव्ही रुममध्ये त्याच्या वडिलांना बांधून ठेवलेलं दिसतं आणि तो त्यांना शोधत जंगलात पळतो आणि त्यामध्ये हणम्या मास्कधारी व्यक्तीच्या तावडीत सापडतो. मस्कधारी व्यक्तीच्या तावडीत सापडल्यामुळे हणम्याच्या जीवाला धोका निर्माण होणार यात शंका नाही. आता मस्कधारी व्यक्ती हणम्याचा जीव घेईल कि हणम्या त्या मस्कधारी व्यक्तीच्या परदाफाश करेल हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. ‘ती परत आलीये’ ही रहस्यमय मालिका प्रसारित होते रात्री १०.३० वाजता झी मराठीवर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.