ETV Bharat / city

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात नियमांचे विघ्न - गणेशोत्सव नियमावली

गणेशोत्सव तोंडावर आला असताना कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी शासनाकडून नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, लसीचे दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. शासनाचा या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी विरोध केला आहे.

चाकरमान्यांच्या मार्गात नियमांचे विघ्न
चाकरमान्यांच्या मार्गात नियमांचे विघ्न
author img

By

Published : Sep 4, 2021, 11:49 AM IST

मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी गेल्या तीन महिन्यापासून रेल्वे आणि एसटी बसेसचे आरक्षण करून ठेवले आहे. मात्र, आता गणेशोत्सव तोंडावर आला असताना कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी शासनाकडून नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, लसीचे दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. शासनाचा या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी विरोध केला आहे. तसेच कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने नवीन नियमावली रद्द करत सर्वांना कोकणात प्रवेश देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, 6 सप्टेंबरला रेल रोको आंदोलन करू, असा इशाराही शासनाला संघटनेने दिला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात नियमांचे विघ्न

कोकणातील जनतेची फसवणूक -

गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दर वर्षी मुंबई आणि उपनगरातील हजारो चाकरमानी गणेशोत्सावासाठी कोकणात जात असतात. महिना-दोन महिने आधीच रेल्वे एसटीचे आरक्षित करून ठेवतात. यासह एसटीचे वैयक्तिक तिकीट आरक्षण, प्रासंगिक करारावर एसटी बस आरक्षित केल्या जातात. यावर्षी 10 सप्टेंबरला गणेशोत्सव असल्याने कोकणवासियांना कोकणात जाण्याची ओढ लागली आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाता न आलेल्या चाकरमानी यंदा खूप हौसेने कोकणात जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी गेल्या तीन महिन्यापासून रेल्वे आणि एसटी बसेसचे आरक्षण करून ठेवले आहे. मात्र, आता गणेशोत्सव तोंडावर आला असताना कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी शासनाकडून नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे कोकणातील जनतेची ही फसवणूक केल्याचा आरोप चाकरमान्यांकडून केला जात आहे.

...अन्यथा रेल्वे रोको आंदोलन -

कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरीत राज्य सरकारने कोरोनाचा पार्श्वभूमीवर नियम व अटी घातल्या होत्या. शासनाच्या या सर्व नियमांचे पालन आम्ही केले होते. मात्र, यंदा सुद्धा गणेशोत्सव तोंडावर असताना शासनाने कोकणात जाणाऱ्यांसाठी नवीन नियम घातले आहे. नेहमीच शासनाकडून कोकणावर अन्याय केला जात आहे. शासनाने कोकणात जाणाऱ्यांसाठी नियम घालायचे होते तर रेल्वे गाड्यांचे व एसटी बसेसचे आरक्षणाचा वेळी घालायला पाहिजे होते. आता अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असताना नवीन नियम घातल्याने सर्वसामान्य चाकरमान्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या मार्गातील हा अटी आणि शर्तीचा अडथळा तात्काळ दूर करावा अन्यथा येत्या 6 सप्टेंबरला रेल रोको आंदोलन करू, असा इशारा राजू कांबळे यांनी प्रशासनाला दिला आहे.

राजकीय कार्यक्रमाला अनुमती?

गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे याची जाणीव शासनाला आहे. मात्र, यंदा शासनाकडून कोरोनाचे कारण समोर करून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याकरिता नव्या नियम आणि शर्थी घातल्या आहे. शासनाचा या निर्णयाचा कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती विरोध करत आहे. सध्या राज्यात राजकीय कार्यक्रम होत आहे. त्यांच्या सभा आणि मेळाव्याना शासनाकडून अनुमती दिली जाते. मात्र, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याकरिता नियमांचे विघ्न घातले आहे. हे अत्यंत्य चुकीचे असून शासनाने तात्काळ गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांवर लादलेले नियम आणि अटी रद्द कराव्यात अशी मागणी कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.