ETV Bharat / city

आता पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना 5 दिवसांऐवजी केवळ 1 दिवसाची सुट्टी

कोविडसाठी काम करणाऱ्या पालिका रुग्णयातील निवासी डॉक्टरांना 10 दिवस काम आणि 5 दिवस सुट्टी देण्यात येते. पण आता पालिका रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांना दाखल केले जात आहे. त्यानुसार आता निवासी डॉक्टरांच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्या असून यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

डॉक्टर
डॉक्टर
author img

By

Published : Sep 8, 2020, 2:32 AM IST

मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांना आता 5 दिवसांऐवजी केवळ 1 दिवस सुट्टी असणार आहे. पालिकेकडून सोमवारी यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले. निवासी डॉक्टरांकडून मात्र या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोविडसाठी काम करणाऱ्या पालिका रुग्णयातील निवासी डॉक्टरांना 10 दिवस काम आणि 5 दिवस सुट्टी देण्यात येते. पण आता पालिका रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांना दाखल केले जात आहे. दरम्यान, रुग्णालयात नॉन कोविड रुग्ण वाढत असल्याने आता मनुष्यबळाचा विचार करता निवासी डॉक्टरांच्या सुट्ट्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता निवासी डॉक्टरांच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्या असून यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

या परिपत्रकानुसार आता निवासी डॉक्टरांना 5 ऐवजी केवळ 1 सुट्टी मिळणार आहे. तर या डॉक्टरांना कोविड-नॉन कोविड या दोन्ही वॉर्डमध्ये काम करावे लागणार आहे. निवासी डॉक्टरांकडून मात्र याला विरोध होण्याची शक्यता आहे. कारण कोविडमध्ये काम केल्यानंतर 1 दिवस सुट्टी झाल्यानंतर नॉन कोविड वॉर्डमध्ये काम करावे लागणार आहे. कोविडमध्ये काम केल्यानंतर किमान 3 ते 4 दिवस लक्षणे समजण्यासाठी लागतात. अशावेळी जर 1 दिवस सुट्टी घेत त्वरित नॉन कोविड रुग्णांना सेवा देणे म्हणजे त्यांना ही संसर्ग देणे होईल. यामुळे आणखी कोविड रूग्ण वाढतील, असा दावा करत निवासी डॉक्टर याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. पण याबाबत निवासी डॉक्टरांच्या केंद्रीय मार्ड वा स्थानिक मार्डकडून अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. तर दुसरीकडे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी या निर्णयामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल असे म्हटले आहे. तर संसर्ग होऊ नये यासाठी गरज पडल्यास निवासी डॉक्टरांची अँटीजन टेस्ट करू असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - विधानपरिषदेच्या १४ व्या उपसभापतीपदासाठी पुन्हा डॉ. निलम गोऱ्हे ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.