मुंबई - मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत विषाणूच्या दोन लाटा आल्या व त्या थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे मुंबईमधील रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या घटली आहे. आज कोरोनाचे 238 नवे रुग्ण (New Corona Cases in Mumbai) आढळून आले आहेत.
तीसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याच प्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद होत होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबरला शून्य रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज १५ डिसेंबरला तिसऱ्यांदा शुन्य रुग्णांची नोंद झाली आहे. मृत्यू संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.
आज 238 नवे रुग्ण -
आज 15 डिसेंबरला 238 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 65 हजार 934 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 45 हजार 200 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 360 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1797 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2514 दिवस इतका आहे. मुंबईमधील 15 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.03 टक्के इतका आहे.